एसी लोकलमधून फुकट्या कर्मचाऱ्यांचा प्रवास

मुंबई : मुंबई लोकलमधून रेल्वे कर्मचारी असल्याचे सांगून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याचीच प्रचिती देणारी एक घटना मध्य रेल्वेवरील एसी लोकलच्या प्रवासात समोर आली आहे. एसी लोकलमध्ये तिकीट तपासण्यासाठी चढलेल्या टीसीने इतर प्रवाशांचे तिकीट तपासले पण काहींनी आपण स्टाफ असल्याचे सांगताच त्यांचे तिकीट तपासले गेले नाही. याचा जाब एका प्रवाशाने तिकीट तपासनीसांना विचारता त्यांनी संबंधित प्रवाशांचे ओळखपत्र आणि तिकीट तपासण्याऐवजी प्रवाशालाच उलट उत्तर दिले. तिकीट तपासनीसांची मग्रुरी पुन्हा एकदा उघडकीस आली आहे.

एसी लोकलचे तिकीट एकतर सर्वसामान्य लोकलपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. त्यात जर रेल्वेचे कर्मचारी असल्याचे सांगून असा विनातिकीट प्रवास होत असेल तर नियम फक्त सर्वसामान्य नागरिकांनाच आहेत का? असा सवाल रेल्वे प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दादर अंबरनाथ एसी लोकलमध्ये नुकतीच घडली आहे. या लोकलमध्ये प्रवाशांचे तिकीट तपासण्यासाठी ४ टीसी चढले. प्रवाशांनी तिकीट दाखवण्यास सुरुवात केली. पण सीटवर बसून आरामात प्रवास करणाऱ्या चार ते पाच जणांनी स्टाफ असल्याचे सांगताच तिथे उपस्थित असलेल्या टीसीने त्यांच्याजवळील तिकीट किंवा पास तपासला नाही. विशेष म्हणजे त्यापैकी एकाच्या खिशात एनआरएमयूचे कार्ड होते. हे पाहून तिथे उपस्थित एका प्रवाशाने या प्रवाशांचे तिकीट का तपासले नाहीत? असा जाब टीसीला विचारला. तर टीसीने या प्रवाशांचे तिकीट तपासण्याचे सोडून प्रवाशालाच उलट
उत्तर दिले.
Comments
Add Comment

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता

उत्तम आरोग्यासाठी महापालिका आयुक्तांनी केल्या अशा सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी उद्यानात आणि व्यायामशाळेत श्रम घेणे गरजेचे आहे.

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम