मुंबई विमानतळ आणि ताज महल पॅलेस हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज महल पॅलेस हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई मेल मुंबई पोलिसांना प्राप्त झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. हा ई मेल मिळाल्यापासून मुंबई पोलीस दल हाय अलर्टवर आहे. पोलिसांनी धमकीचा ई मेल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज महल पॅलेस हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई मेलद्वारे देण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर तीन - चार दिवसांत बॉम्बस्फोट होणार अशी धमकी ई मेलद्वारे देण्यात आली आहे. हा धमकीचा ई मेल मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाला प्राप्त झाला. पाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज महल पॅलेस हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई मेल मुंबई पोलिसांना प्राप्त झाला आहे.

सायबर पोलीस दोन्ही ई मेल प्रकरणी तपास करत आहेत. अद्याप कुठेही स्फोट झालेला नाही. पोलिसांनी दोन्ही ई मेलचा सेंडर शोधण्याचे प्रयतन सुरू केले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी गस्तीत वाढ केली आहे. तसेच महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी बंदबस्त वाढवला आहे.
Comments
Add Comment

मेट्रोत झोपलात, तर भरावा लागेल हजारोंचा दंड!

दररोज असंख्य लोक रेल्वेप्रमाणेच मेट्रोने प्रवास करतात आणि प्रवास म्हटलं की थोडी झोप आलीच. पण मेट्रो प्रवासातील

देशामध्ये २२ बनावट विद्यापीठे

‘यूजीसी’ने जाहीर केली यादी मुंबई  : मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात