दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेने पुण्यात ‘हाय अलर्ट’

पुणे : भारत आणि पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूरनंतर तणाव वाढला होता. शस्त्रसंधीमुळे तणाव कमी झाला असला तरी पाकिस्तान किंवा दहशतवाद्यांकडून हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर पुणे शहरात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर दहशतवादी संघटनांकडून संभाव्य हल्ल्याचा धोका लक्षात घेता पुणे पोलिसांनी सुरक्षा उपाययोजनांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे.


दहशतवादी हल्ल्याच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पुणे शहरात १२ जून २०२५ पर्यंत काही हवाई उपकरणांच्या वापरावर बंदी घातली आहे. यात ड्रोन, रिमोट कंट्रोल एअरक्राफ्ट, मायकोलाइट विमान, पॅराग्लायडर, पॅरामोटर, हॅण्डग्लायडर, हॉट एअर बलून इत्यादी उपकरणांचा समावेश आहे. पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी या संदर्भात आदेश जारी केले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने ही बंदी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.


पाकिस्तानने अलीकडेच जम्मू, राजस्थान आणि पंजाब सीमांवर आक्रमक पावले उचलली होती. त्यानंतर भारतानेही लाहोर, कराची आणि इस्लामाबादमध्ये ड्रोनद्वारे लक्ष्य करून जोरदार प्रत्युत्तर दिले. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख शहरांमध्ये ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मुंबईतही पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. धार्मिक स्थळे, पर्यटन केंद्रे आणि सार्वजनिक ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे.



‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान काही ठिकाणी ब्लॅकआउटचीही अंमलबजावणी करण्यात आली होती. या सर्व घडामोडींचा विचार करता, पुण्यासह मुंबईत हल्ल्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे पुणे पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली, तर तत्काळ पोलिसांना सांगा असे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी

IMD Weather Update : तिहेरी संकट! महाराष्ट्रासह १४ राज्यांवर पावसाचा धोका; IMD कडून 'हाय अलर्ट' जारी

नवी दिल्ली : भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी नैसर्गिक घडामोड झाली असून, एकाच वेळी दोन कमी दाबाचे

Jejuri Dussehra : मर्दानी दसऱ्याची सांगता! फक्त ४ मिनिटांत ९० वेळा फिरवली ४२ किलो वजनाची खंडा तलवार

जेजुरी : कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर आज 'खंडा स्पर्धे'ने मर्दानी दसरा उत्सवाची सांगता झाली. या