मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी ‘शैक्षणिक किट’

  10

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शैक्षणिक विभागाचा निर्णय


पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसांपासूनच म्हणजेच १५ जून २०२५ पासूनच शैक्षणिक साहित्यांचा समावेश असणारे एक किट देण्यात येणार आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.


विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना शैक्षणिक साहित्याचा अभाव असल्यामुळे अडचण येऊ नये, यासाठी लवकरात लवकर शैक्षणिक किटचे वितरण पूर्ण व्हावे, यादृष्टीने महानगरपालिका प्रशासनाने नियोजन केले आहे. त्या अानुषंगाने शैक्षणिक किट वितरण प्रक्रिया ई-रूपी या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे पूर्ण केली जाणार आहे.


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेट लाभ हस्तांतरण उपक्रमांतर्गत ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. ज्यामध्ये ई-रूपी डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे सुरक्षित, रोखविरहित व्यवहार करून विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य पुरविले जाते. या किटमध्ये यंदा पालक आणि शाळांकडून मिळालेल्या अभिप्रायाचा विचार करून काही नवीन वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिकदृष्ट्या आवश्यक असणाऱ्या वस्तू या किटमध्ये आहेत.


मागील वर्षी ई-रूपी प्रणाली अंतर्गत ५१ हजार २०३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले होते, तर यावर्षी बालवाडी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यंदाच्या वर्षी बालवाडीच्या विद्यार्थ्यांनाही डीबीटी योजनेचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आता बालवाडीतील विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक किट मिळेल. या किटमध्ये टिफिन बॉक्स आणि चित्र काढण्यासाठी उपयुक्त असे रंग, यासारख्या नवीन वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय शाळांमध्ये उशिरा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी १० जुलैपासून दुसऱ्या टप्प्यातील वितरण सुरू होणार आहे.



...अशी आहे ई-रूपी प्रक्रिया




  • ई-रुपी हे एक डिजिटल व्हाउचर असून यासाठी बँक खाते आवश्यक नाही.

  • यामध्ये लाभार्थ्यांना एसएमएसद्वारे प्री-पेड क्युआर कोड व्हाउचर प्राप्त होते.

  • हे व्हाउचर केवळ शाळा साहित्य खरेदीसाठीच वापरता येते.

  • यासाठी फक्त १० अंकी वैध संपर्क क्रमांक आवश्यक.

  • अतिरिक्त सुरक्षेसाठी ओटीपीद्वारे व्यवहार पडताळणी होते.


थेट लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवसांपासूनच शैक्षणिक किटचे वितरण सुरू केले जाईल. प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची समान संधी देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. डीबीटी यंत्रणेत सुधारणा करून आणि किटमध्ये उपयुक्त वस्तूंचा समावेश करून विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी आमचे प्राधान्य आहे.
शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महापालिका


शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ई-रूपी आधारित डीबीटी प्रक्रियेद्वारे शैक्षणिक किटचे वाटप करण्यात येईल. विद्यार्थ्यांपर्यंत जलद लाभ पोहोचवण्यासाठी ई-रुपी डीबीटी मॉडेल उपयुक्त ठरत आहे. यावर्षीच्या सुधारित प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन प्रक्रिया करण्यात आली आहे.
प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड मनपा

Comments
Add Comment

विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आड लपून राजकारण करु नये

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी - उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई : शेतकरी

चंद्रपूरातील नाल्याच्या संरक्षण भिंतीचे प्रकरण विधानसभेत गाजले!

मुंबई: चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात हवेली गार्डन ते आकाशवाणी रोडवरील नाल्याच्या संरक्षण भिंतीच्या

कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दरवर्षी करतात सहा हजाराहून अधिक वारकऱ्यांची सेवा

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा, विठ्ठल मळ्यात जपलीय परंपरा..! १६ वर्षांची परंपरा; ४० दिंड्यांतील सहा हजार

Prasad Tamdar Baba : अंग चोळून अंघोळ अन् शरीरसंबंध; भोंदूबाबा प्रसादचे हायटेक कारनामे उघड

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील भोंदूबाबाच्या कारनाम्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. मोबाईलच्या

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर