Nagpur Bike Taxi : नागपुरात लवकर सुरु होणार बाईक टॅक्सी!

व्यवसाय करणाऱ्यांसाठी परवाना अनिवार्य


नागपूर : एक लाख लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये दुचाकी टॅक्सी सेवा सुरु करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.त्यामुळे आता नागपुरातही बाईक टॅक्सी सुरु होणार आहे.या बाइक इलेक्ट्रिक राहणार असून त्यावर पिवळा रंग असणार आहे. चालकाचे वय २० वर्षांहून अधिक व ५० वर्षांपेक्षा कमी असावे आदी नियमही घालून देण्यात आले आहे.


ज्याला बाइक टॅक्सीचा व्यवसाय करायचा आहे त्या ऍग्रीगेटरकडे किमान ५० इलेक्ट्रिक बाइक असणे आवश्यक आहे. त्याला राज्य परिवहन प्राधिकरण यांच्याकडून एकच परवाना देण्यात येणार आहे. या परवान्याची वैधता ५ वर्षाची असेल. सर्व बाइक पिवळ्या रंगात असाव्यात आणि त्यावर बाइक-टॅक्सी असे लिहिणे, दुचाकी-टॅक्सीवर सेवा-प्रदात्याचे नाव आणि संपर्क क्रमांक लिहिणे आवश्यक राहणार आहे. बाइक टॅक्सी चालकाकडे बेंज असण्यासोबतच चालकाचे वय २० वषार्पेक्षा कमी आणि ५० वर्षापेक्षा जास्त नसण्याची अट आहे. त्यामुळे या व्यवसायात तरुणांची संख्या वाढणार आहे. सोबतच दरदिवशी दुचाकी चालविण्याकरिता ८ तासांची मर्यादा असणार आहे.



प्रवाशांसाठी सुरक्षा


प्रवाशांचा सुरक्षतेसाठी बाइक टॅक्सीमधून एकावेळी एकाच प्रवाशाला घेऊन जाता येणार आहे. १२ वर्षाखालील मुलांना प्रवासाकरिता परवानगी नसेल. महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व बाइक टॅक्सींना प्रवासी आणि चालक यांच्यामध्ये विभाजक बसविण्यात येतील. जीपीएस ट्रेकिंग, संकटकालीन संपर्क सुविधा, वेग पडताळणी, दुचाकी चालक आणि प्रवासी यांकरिता हेल्मेट बंधनकारक असेल. अपघात आणि मृत्यू या दोन्हींकरिताचे विमा संरक्षण सेवा प्रदात्याने उपलब्ध करून देणे बंधनकारक असणार आहे.



लवकरच दर ठरवणार


काही कालावधीनंतर महिला चालकांचे प्रमाण टप्प्याटप्याने वाढवून ते ५० टक्के करण्याची जबाबदारी परवानाधारकाची राहणार आहे. बाइक टॅक्सीकरिता परवानाधारकाने दुचाकी-टॅक्सी स्थानक, चढण्याचे आणि उतरण्याचे ठिकाण दर्शवणे आवश्यक राहणार आहे. बाइक टॅक्सीच्या दराचे नियंत्रण संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून करण्यात येईल. त्यामुळे लवकरच दर ठरविण्यात येईल. नियमात बसणा-या एग्रीगेटरला मान्यता देण्यात येईल. तूर्तास एकही ऍग्रीगेटरने अर्ज केलेला नाही, अशी माहिती विजय चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर ग्रामीण यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadanvis : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिवादन

सातारा दि. ३ : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या खंडाळा

इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे वादाच्या भोवऱ्यात ; पुणे परिवहन मंडळाचा अथर्वला इशारा

PMPML Issues Notice Influencer Atharva Sudame: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे

सहा किलोमीटरची जीवघेणी पायपीट, बाळाचा पोटातच मृत्यू, टाहो फोडत आईनंही जीव सोडला

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील रस्ते आणि आरोग्य सुविधांच्या अभावामुळे एका नऊ महिन्यांच्या

प्रशासनाचा भोंगळ कारभार! मृत शिक्षकाला लावली निवडणूक ड्युटी

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. शैक्षणिक क्षेत्रातील दोन मृत

भारतात वर्षभरात १६६ वाघांचा मृत्यू

३१ बछड्यांचा समावेश नागपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या

राज्यात थंडी वाढणार! काही ठिकाणी तुरळक पावसाचाही अंदाज

मुंबई: नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. १ जानेवारीला कोकणात