क्षेत्रीय तपासणी संचद्वारे पाणी गुणवत्ता तपासणी मोहीम सुरू

मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांची माहिती


अलिबाग : पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक व जैविक पाणी गुणवत्ता तपासणी करण्यासाठी १२ मे ते ७ जून २०२५ या कालावधीत जिल्ह्यात क्षेत्रीय तपासणी संचद्वारे पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व १,८३१ गावांमध्ये ही मोहीम राबवून नागरिकांना स्वच्छ, शुद्ध गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलबध करून देण्यात येणार असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी दिली.


पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती मोहिमेतंर्गत रासायनिक व जैविक क्षेत्रीय तपासणी (एफ.टी.के.) संचाद्वारे गावांमध्ये जनजागृती अभियान राबविण्याबाबतच्या सुचना दिल्या आहेत. या मोहिमेंतर्गत गावात पाणी तपासणी करण्यासाठी निवड केलेल्या व संकेतस्थळावर नोंदविलेल्या पाच महिलांची पडताळणी करणे, महिलांच्या पाणी गुणवताविषयक एफ.टी.के. प्रशिक्षणाच्या नोंदी घेणे, गावात आठवी ते दहावीमधील विद्यार्थ्यांना एफ.टी.के. किटव्दारे पाणी तपासणीचे प्रात्यक्षिक देणे, ८ ते १० मधील विद्यार्थ्यांमार्फत शाळा, अंगणवाड्या, घरगुती नळजोडण्यांमधील पाणी नमुने तपासणी करणे, डब्ल्यूएमआयएस पोर्टलवर नोंदी घेणे, नळ पाणीपुरवठा योजना स्त्रोत, घरगुती नळजोडण्या, शाळा, अंगणवाड्यांची पाणीगुणवता तपासणी करण्यासाठी रासायनिक व जैविक एफ.टी.के.संचाचे वाटप करणे, स्थानिकांना पाणीगुणवत्ता तपासणी व त्यापासून होणारे फायदे सांगितले जाणार आहे.



दरम्यान, एफ.टी.के. संचाद्वारे पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती मोहीमेमध्ये विविध विभागांचा सहभाग राहील. त्यामध्ये ग्रामपंचायत विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, पाणीपुरवठा विभागाचा सहभाग राहील. सर्वांच्या मदतीने व्यापक जनजागृती मोहीम यशस्वी केली जाणार आहे. नागरिकांनी याकामी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन भोसले यांनी केले आहॆ.


काय आहे क्षेत्रीय तपासणी संच?


एफ.टी.के.म्हणजे क्षेत्रीय पाणी तपासणी संच आहे. जे प्राथमिक स्वरूपात पिण्याच्या पाण्यातील रासायनिक आणि जैविक घटकांची तपासणी करण्यासाठी वापरले जाते. यामुळे पाण्याची गुणवत्ता त्वरित ठरविणे, गावपातळीवर नागरिकांना पाण्यातील अशुद्धता ओळखण्यास मदत करणे हा या संचाचा उद्देश आहे. यामध्ये पीएच स्तर, क्लोरीन, नायट्रेट, क्लोराइड, क्लोराईड, लोह, अल्कलिनिटी, गढुळपणा, हार्डनेस, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, तसेच जैविक प्रदूषणाबाबत तपासणी केली जाते. याचा प्राथमिक स्तरावर लगेच निकाल मिळतो. या संचाद्वारे पाणीपुरवठा स्त्रोत, शाळा, अंगणवाडी व घरगुती नळजोडण्याची पाणी गुणवत्ता तपासली जाणार आहे.

Comments
Add Comment

पनवेल–कळंबोली दरम्यान पॉवर ब्लॉक

पनवेल : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (डीएफसीसी) प्रकल्पाच्या अनुषंगाने, किमी ६३/१८ ते ६३/२४ दरम्यान ११०

जिल्ह्यातील १८१ आदिवासी वाड्या रस्त्याविना

अलिबाग : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहासोबत आणण्याचा आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवून यावा, या उद्देशाने

अवचित गडाचा मार्ग आता होणार सुखकर

खारापटीतील तरुणांनी केली रस्ता दुरुस्ती रोहा : ऐतिहासिक वारसा असलेल्या अवचित गडावर जाणाऱ्या रस्त्याची

लोकअदालतीतून वर्षभरात १९ संसारांचे पुनर्मिलन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे समुपदेशन; तुटणाऱ्या नात्यांना नवसंजीवनी अलिबाग: बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव,

रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा आधारवड

८ महिन्यांत ६० रुग्णांना मिळाली मदत अलिबाग:रायगड जिल्ह्यातील गरीब, गरजू रुग्णांसाठी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री

वर्षभरात ६२७ अपघातात २५८ जणांचा मृत्यू

रस्ते बनलेत मृत्यूचा सापळा; अपघातांना कारणीभूत धोकादायक वळणे, रस्त्यांची दुरवस्था वाहनांची वाढलेली वर्दळ,