महाराष्ट्रातील धरणांमध्ये फक्त २८ टक्के पाणीसाठा

मुंबई : उकाड्याने राज्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. राज्याच्या काही भागांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने उपलब्ध जलसाठ्याची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील प्रमुख धरणांमध्ये २८.०९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागच्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये या कालावधीत २३.४३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे. शासनाने दिलेल्या माहितीनुसार, फक्त ८,१६६.१७ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.


सर्वाधिक ३८.१३ टक्के पाणीसाठा अमरावती येथील धरणांत आहे.कोकणातील धरणांमध्ये ३४.१५ टक्के, नागपूर येथील धरणांमध्ये ३२.७९ टक्के पाणीसाठा, छत्रपती संभाजीनगरच्या धरणांमध्ये ३१.२३ टक्के, नाशिकच्या धरणांमध्ये ३१.३५ टक्के तर पुण्यातील धरणांमध्ये २१.५२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये १४,२५३.३६ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा उरला आहे. त्यापैकी ८,१६६.१७ दशलक्ष घनमीटर एवढाच उपयुक्त पाणीसाठा आहे.


नागपूर येथील धरणांमध्ये ११३५.४ दशलक्ष घनमीटर, अमरावतीच्या धरणांमध्ये ९०१.४१ दशलक्ष घनमीटर, छत्रपती संभाजीनगरच्या धरणांमध्ये १४०३.८२ दशलक्ष घनमीटर, नाशिकच्या धरणांमध्ये ११६९.५६ दशलक्ष घनमीटर, पुण्याच्या धरणांमध्ये २६७८.३२ दशलक्ष घनमीटर, कोकणातील धरणांमध्ये ८७७.६६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे.


महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा या सात धरणांतून पाणीपुरवठा होतो. या सात धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३७७ दशलक्ष लिटर आहे. या धरणांच्या तलावांतून मुंबईला दररोज चार हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. सध्या मुंबईला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या धरणांच्या जलाशयांमध्ये १९.१७ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच तारखेला हा साठा १३.६३ टक्के होता.


नाशिक जिल्ह्यातील २४ धरणांमध्ये १८ हजार ६२४ दशलक्ष घनफूट अर्थात २८.३६ टक्के जलसाठा आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात २५०० दशलक्ष घनफूट अर्थात ४४.४० टक्के जलसाठा आहे. कश्यपीत ६५९ घनफूट अर्थात ३५.५८ टक्के, गौतमी गोदावरीत १६९ घनफूट अर्थात नऊ टक्के, आळंदीत १०३ घनफूट अर्थात १२.६२ टक्के जलसाठा आहे. माणिकपुंज हे धरण कोरडेठाक झाले आहे. इतर आठ धरणांमधील पाणीसाठा अल्प झाला आहे.


महाराष्ट्रातील सर्व मध्यम आकाराच्या धरणांमध्ये ३८.९८ टक्के तर लघू आकाराच्या धरणांमध्ये ३१.५५ टक्के तर महाराष्ट्र राज्य प्रकल्पातील धरणांमध्ये २९.९४ टक्के पाणीसाठा आहे.

Comments
Add Comment

Election Commission of India : मतदार यादीतून नाव वगळले का?

येत्या ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पुन्हा नाव नोंदणीची संधी मुंबई : भारत निवडणूक आयोगाकडून १९ ऑगस्ट २०२६ रोजी मतदार

Ritu Tawde : महापौरांच्या गाडीतून त्या नवजात बाळाचा झाला गृहप्रवेश

बाळंतिणीच्या मदतीला धावून गेल्या महापौर मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची प्रसारमाध्यमातून विविध

Crime News : मुंबईत तरुणाला धावत्या लोकलमधून लाथ मारून खाली पाडले; आरोपीला अटक

मुंबई : मुंबईतील धावत्या लोकलमधून तरुणाला लाथ मारून खाली पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकलच्या

Central Railway : मध्य रेल्वेवर रविवारी ३० ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक; अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावणार, ट्रान्स-हार्बर सेवाही बंद

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे अभियांत्रिकी आणि देखभालीची विविध कामे पूर्ण करण्यासाठी रविवार, ३०

Orry broke his silence on dispute : "माझ्यासाठी तो काळ नरकासारखा होता"; ओरीच साराच्या आईसोबत काय वाकड ? सारा सोबतची मैत्रीही तुटली, धक्कादायक खुलासे

मुंबई : सोशल मीडिया स्टार ओरहान अवत्रामणी म्हणजेच सर्वांचा लाडका 'ओरी' (Orry) सध्या त्याच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा

Chinchpoklicha Chintamani Aganman 2026 : आला आला आला 'चिंचपोकळीचा चिंतामणी' आला! उद्या भव्य आगमन सोहळा; काय आहे वेळ, मार्ग अन् गर्दीचे नियोजन ? जाणून घ्या

मुंबई : मुंबईतील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचा (Chinchpoklicha Chintamani Agaman Sohla 2026) बहुप्रतिक्षित