Sankashti Chaturthi: उद्या एकदंत संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या पूजा पद्धत आणि शुभ मुहूर्त

Ekdant Sankashti Chaturthi 2025: मे महिन्याची संकष्टी चतुर्थी एकदंत संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी भगवान श्रीगणेश आणि चंद्राची पूजा केली जाते. या दिवशी माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. पंचांगानुसार, यावर्षी एकदंत संकष्टी चतुर्थी शुक्रवारी, १६ मे २०२५ रोजी म्हणजे उद्या आहे.


हिंदू कॅलेंडरनुसार, ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला एकदंत संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे. या चतुर्थीला गणपती बाप्पाच्या एकदंत रूपाची पूजा केली जाते. गणेशाचे एकदंत रूप हे अष्टविनायक रूपांपैकी एक मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, एकदंत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची विधिवत पूजा आणि उपवास केल्याने सुख-समृद्धी वाढते आणि संततीची इच्छा देखील पूर्ण होते.



ज्येष्ठ महिन्यातील एकदंत संकष्टी चतुर्थीच्या पूजेची वेळ आणि पद्धत जाणून घेऊया. 



शुभ मुहूर्त


चतुर्थी तिथी सुरू - १६ मे २०२५ सकाळी ०४:०२ वाजता
चतुर्थी तिथी समाप्त - १७ मे २०२५ रोजी सकाळी ०५:१३ वाजता
चंद्रोदयाची वेळ - रात्री १०:३९



पूजा पद्धत


सकाळी उठून श्रीगणेशाला पाणी अर्पण करा. त्यानंतर फुले आणि फळे अर्पण करा आणि पिवळे चंदन लावा. ॐ गं गणपतये नमः या मंत्राचा जप करा.  संध्याकाळी पूर्ण भक्तीने गणपतीची आरती करा. त्यानंतर तुम्ही बनवलेला प्रसाद नैवेद्य म्हणून ठेवा. त्यानंतर उपवास सोडण्याआधी चंद्राचे दर्शन घ्या, आणि अन्नग्रहण करा.


अस्वीकरण: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. त्यामुळे या संदर्भात  सविस्तर आणि अधिक माहितीसाठी,संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या.

Comments
Add Comment

सायन प्रतीक्षा नगर येथील चार इमारती अतिधोकादायक घोषित

सायन प्रतीक्षानगर येथील म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील चार इमारती

रोहित शर्मा टी-२० विश्वचषकाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

दुबई : भारताच्या माजी कर्णधार आणि दोन वेळा टी-२० विश्वचषक विजेता रोहित शर्मा याची आगामी टी-२० विश्वचषक २०२६ साठी

अलिबाग-मुरुड बस सेवा ठप्प ; प्रवाशांचा खोळंबा

नांदगाव मुरुड ( वार्ताहर): अलिबाग आगारातून मुरुडकडे जाणाऱ्या एसटी बस सेवेत मंगळवारी गंभीर गफलत पाहायला मिळाली.

वंदना गुप्ते यांना 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार' जाहीर

मुंबई : मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार' यंदा ज्येष्ठ अभिनेत्री वंदना

लोणावळा स्टेशनवर RPF जवानांचे धाडस; प्रवासी थोडक्यात बचावला

पुणे : रेल्वे प्लॅटफॉर्मवर नेहमीच प्रवाशांची धावपळ सुरू असते. चालू गाडी पकडण्याची घाई अनेकदा जीवघेणे प्रसंग

वसईत विषारी वायूची गळती ; १३ जण बाधित

वसई : पाण्याच्या टाकीजवळ असणाऱ्या वायूच्या सिलेंडरमधून विषारी वायूची गळती झाली. या वायू गळतीमुळे परिसरातील