BEST भाडेवाढीचा फटका: प्रवासी पळाले, बस थांबे ओस पडले; शेअर ऑटोवाल्यांची चांदी!

  94

मुंबई : ‘सार्वजनिक सेवा’ ही केवळ कागदावरच उरली आहे का? BEST प्रशासनाने ९ मेपासून बसभाड्यात अचानक वाढ केल्यानंतर, प्रवाशांनी बेस्टकडे थेट पाठ फिरवली आहे. रोज हजारो मुंबईकरांचा भरवसा असलेली ही सेवा आता ओस पडली आहे. प्रवासी संख्या रोडावली आहे. बस थांबे रिकामे झालेत आणि मुंबईकर शेअर ऑटो-टॅक्सीच्या जुन्याच आडवाटेवर वळलेत.


सूत्रांच्या माहितीनुसार, BEST बससेवेची दररोजची प्रवासी संख्या किमान १० टक्क्यांनी घटली आहे. पण खरा धक्का म्हणजे ही फक्त सुरुवात आहे. प्रशासनाला धडकी भरलीय की ही घट आणखी वाढणार आणि प्रवासी कायमचे पर्यायी वाहतुकीत मिसळून जातील, अशी दाट शंका आहे.



भाडं वाढवलं, पण सेवा तशीच बकाल!


भाडं वाढूनही ना वेळेवर बस, ना योग्य सेवा. उलट प्रवाशांना बससाठी ३०–४० मिनिटं वाट पहात थांबावं लागतं. त्यात AC-Non AC भाडं अनुक्रमे १२ आणि १० रुपये केल्यावर लोकांनी तेवढ्या रकमेत शेअर ऑटोचा पर्याय निवडला आहे. काही ठिकाणी लोकांना १२ ऐवजी १५ रुपये द्यावे लागतात. बसपेक्षा ३ रुपये अधिक मोजावे लागले तरीही लोक खूशीने शेअर रिक्षा-टॅक्सीने लवकर जाता येते म्हणून खूश आहेत.


भाडेवाढीचा फटका मुख्यत्वे कामवाली बाया, सुरक्षा रक्षक, वयोवृद्ध, कामगार आणि मध्यमवर्गीय नोकरदारांना बसलाय. आता हेच लोक ३ रुपये जास्त देऊन १५चा शेअर ऑटो घेतात, पण २० मिनिटं बसची वाट बघत नाहीत.



शेअर ऑटोवाल्यांचीच चांदी!


मुलुंडच्या स्वप्न नगरीत भरत सोनी सांगतात, “४० मिनिटं बसची वाट बघणं म्हणजे वेळेचा अपमान. त्यापेक्षा तेच १० रुपये देऊन शेअर ऑटोने निघालेलं बरं!”


हिलसाईड रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशनने जोरात टोला लगावला की, “भाडेवाढीचा फटका मुख्यतः कामगार, नोकरदार, वयोवृद्ध यांना बसतोय. आता तेही १५ रुपये देऊन ऑटो घेतात पण बसची वाट बघत नाहीत.”



आधीच चाललेली सेवा, आता अधिक कोलमडली


‘आमची मुंबई आमची BEST’च्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, “पूर्वी ५/६ रुपये इतकं स्वस्त भाडं होतं. त्यावेळी लोकांच्या खिशाला परवडत होतं. आता मात्र भाडेवाढ झाल्याने तेवढ्याच पैशात १०/१२ रुपये देऊन लोकं शेअर टॅक्सी-ऑटोमध्ये वळत आहेत. ज्यामुळे ट्रॅफिक आणि प्रदूषण दोन्ही वाढतंय.”


वाहतूक विश्लेषक हुसैन इंदोरेवाला म्हणतात, “सरकारने वेळेवर मदत केली असती, तर ही अवस्था आली नसती. खासगीकरणाच्या नावाखाली सेवा मोडीत काढली जातेय.”


“महिम बसस्थानकाला भेट दिली तेव्हा धक्का बसला. इतकं मोठं वर्दळीचं ठिकाण पण येथे बसच नाहीत आणि प्रवासीही नाहीत! एवढं रिकामं दृश्य याआधी कधीच पाहिलं नव्हतं.”


BESTने भाडं वाढवलं, पण दर्जा वाढवला नाही. यामुळे मुंबईकरांनी नाराजीने आपला रस्ता बदलला. सरकार आणि प्रशासन जर वेळेवर जागं झालं नाही, तर BEST ही सेवा 'भूतकाळातली आठवण' म्हणूनच उरू शकते! असेही अनेकांनी सांगितले.


दरम्यान, BEST अधिका-यांनी ही घट उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे असल्याचे सांगितले असले, तरी मुंबई मोबिलिटी फोरम आणि 'आमची मुंबई आमची BEST' या नागरी संस्थांनी ही कल्पना फेटाळली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, "ही घट म्हणजे प्रवाशांनी पर्यायी वाहतुकीचा मार्ग निवडल्याचा हा परिणाम झालेला आहे."

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही