Asthma : आला पावसाळा, दमा असलेल्यांनी काळजी घ्या!

  41

मान्सूनसाठी पोषक वातावरण आहे. एक दोन दिवसात अंदमान निकोबार बेटे व दक्षिण बंगालच्या उपसागराच्या काही भागात मान्सून पोहचण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या अनेक भागात अवकाळी पाऊस पडतोय. त्यामुळं पावसाळी वातावरणाचा फील अनुभवायला मिळतोय. येत्या पंधरा दिवसांनी प्रत्यक्ष पावसाळा सुरू होईल. सध्या तापमान कमी जास्त होतेय. त्यामुळं वातावरण बदलत आहे. पावसाळी ऋतूमध्ये सर्दी , ताप, खोकला व साथीचे आजार उद्भवतात. दम्याचा त्रास असणाऱ्यांनी या काळात विशेष काळजी घ्यायला हवी.

?si=SyP_o4pciX-HwJVk

पावसाळ्यात दम्याचा त्रास जास्त संभवतो. त्यामागे हवेतील आर्द्रता, वातावरणातील अचानक बदल, घराच्या भिंतीला ओल आणि त्यामध्ये निर्माण होणारे मोल्ड किंवा बुरशी ही त्याची कारणं आहेत. या संपर्कातून सतत खोकला, छातीवर दाब, श्वास घेताना होणारा त्रास-घरघर अशी काही लक्षणे दिसतात. अस्थमा किंवा दमा हा श्वासनलिकेचा आजार आहे . हा ५-६ टक्के लोकांमध्ये आढळतो. लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आढळतं. पावसाळ्यात अस्थमा म्हणजेच दम्याचा अटॅक येण्याची शक्यता अधिक असते.

आता अस्थम्याचे प्रकार व कारणे काय ? ते पाहू


काही रुग्णांचा दमा हा वंश परंपरागत असतो किंवा काही रुग्णांना अचानकच उतारवयात सुद्धा जाणवतो. कधी दमा फक्त ऋतूप्रमाणे असतो तर कधी बाराही महिने. वाढणारे वजन आणि ओबेसीटी हे सुद्धा दम्याचे एक कारण असू शकते, असे आरोग्य तज्ञ सांगतात. धूळ, परागकण यांची एलर्जी, बदलती जीवनशैली, धकाधकीचं जीवन, अपुरी झोप ही दम्याची काही कारणं सांगता येतील.


दम्याच्या त्रासपासून बचावासाठी काळजी काय घ्याल?


१. घराबाहेर मास्कचा वापर करावा.

२. बाहेरचे खाणे टाळावे.

३. फ्लू लसीकरण जरूर करून घ्यावे.

४. घरातील भिंतीवर असलेली ओल आणि बुरशी काढण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे.

५. हवेतील आर्द्रता जास्त असल्यास रूम हीटरचा वापर करता येईल.

सर्वप्रथम दम्याच्या रुग्णांचा शत्रू म्हणजे अॅलर्जी. अलर्जी शोधल्यावर त्यापासून दूर करण्यासाठी जीवनशैली बदलायची गरज असते. इनहेलर थेरपी हीच दम्यासाठी प्राथमिक उपचार पद्धती आहे आणि ते योग्य पद्धतीने वापरणे आवश्यक आहे. दमा उपचारासाठी फुफ्फुसविकारतज्ज्ञ यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
Comments
Add Comment

Mohammad Shami: कोलकाता उच्च न्यायालयाकडून मोहम्मद शमीला मोठा झटका

नवी दिल्ली: कोलकाता उच्च न्यायालयाकडून क्रिकेटर मोहम्मद शमीला मोठा झटका बसला आहे. उच्च न्यायालयाने शमीला त्याची

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

टाकीचा स्लॅब कोसळून चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

आमदार निकोलेंच्या प्रश्नावर पाणीपुरवठा मंत्र्यांची कारवाई पालघर : डहाणू तालुक्यातील गट ग्रामपंचायत चळणी

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर