वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी दोन्ही संघांची घोषणा

११ ते १५ जून दरम्यान खेळणार सामना


सिडनी : क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा केली आहे. संघ ११ ते १५ जून दरम्यान इंग्लंडमधील लॉर्ड्सच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे. अष्टपैलू कॅमरुन ग्रीन संघात परतला आहे. ग्रीनने पाठीच्या दुखापतीपूर्वी मार्च २०२४ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स १५ सदस्यीय संघाचे नेतृत्व करेल. ऑस्ट्रेलियन संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सच्या तिसऱ्या अंतिम फेरीत आपले विजेतेपद राखण्याचा प्रयत्न करणार आहे.


बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताविरुद्ध पदार्पण करणाऱ्या युवा सॅम कॉन्स्टास्कलाही अंतिम संघात स्थान मिळाले आहे. याशिवाय, ब्रेंडन डॉगेटला प्रवासी राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान मिळाले आहे. शेफील्ड शिल्डच्या अंतिम सामन्यात ब्रेंडन सामनावीर होता. ऑस्ट्रेलियाच्या जाहीर झालेल्या संघात पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), कॅमेरून ग्रीन, जोश इंगलिस, मिचेल स्टार्क, ब्यू वेबस्टर, जोश हेझलवूड, मॅट कुहनेमन, नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड यांचा
समावेश आहे.


वेस्ट इंडिज संघासोबत खेळणार ३ कसोटी : ऑस्ट्रेलियाचा संघ या दरम्यान २५ जून ते १६ जुलै दरम्यान वेस्ट इंडिजमध्ये तीन कसोटी सामने खेळणार आहेत. पहिली कसोटी २५-२९ जून दरम्यान ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे खेळवली जाणार आहे, तर दुसरी कसोटी ३-७ जुलै दरम्यान सेंट जॉर्ज, ग्रेनाडा आणि तिसरी कसोटी १२-१६ जुलै दरम्यान किंग्स्टन, जमैका येथे खेळवली जाणार आहे.


ऑस्ट्रेलियापाठोपाठ द. आफ्रिकेचा संघ जाहीर


ऑस्ट्रेलियापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेनेही आपला संघ जाहीर केला आहे. या दोन्ही संघात ११ जून रोजी इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. आफ्रिकेने जाहीर केलेल्या संघात टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी जोरजी, एडेन मार्करम, वियान मुल्डर, मार्को यानसेन, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कॉर्बिन बॉश, काइल व्हेरेन, डेव्हिड बेडिंगहॅम, ट्रिस्टन स्टब्स, रायन रिकेल्टन, सेनुरन मुथुसामी, डेन पॅटरसन यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

आयसीसी महिला वर्ल्ड कप २०२५ : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका फायनल; जाणून घ्या भारताचे सामर्थ्य

आयसीसी महिला वर्ल्ड कप २०२५ मधला सर्वात मोठा सामना आज, रविवार २ नोव्हेंबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात

होबार्टमध्ये चमकला ऑस्ट्रेलियाचा विक्रमवीर फलंदाज टीम डेव्हिड

होबार्ट : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी-२० सामना होबार्ट येथे रंगला असून, या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा

INDvsAUS T20 : भारतापुढे १८७ धावांचे आव्हान

होबार्ट : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा टी २० सामना होबार्ट येथील बेलेरिव्ह ओव्हल स्टेडियममध्ये सुरू आहे.

टी-२० वर्ल्डकप तोंडावर असताना केन विल्यमसनचा निवृत्तीचा निर्णय, न्यूझीलंडला मोठा धक्का

मुंबई : टी-२० वर्ल्डकप २०२६ जवळ येत असतानाच न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विल्यमसन (३५) याने टी-२० आंतरराष्ट्रीय

INDvsAUS T20 : नाणेफेक जिंकून भारताचा गोलंदाजीचा निर्णय, प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज बाद

होबार्ट : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा टी २० सामना होबार्ट येथील बेलेरिव्ह ओव्हल स्टेडियममध्ये सुरू आहे.

ऐतिहासिक महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ मध्ये प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका

नवी मुंबई : महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना (फायनल मॅच) नवी मुंबईच्या डी. वाय पाटील