शिर्डी संस्थानची 'डोनेशन पॉलिसी' लागू, साई भक्तांसाठी १० हजारात थेट आरती!

  39

शिर्डी : शिर्डीच्या साईबाबा संस्थानने भाविकांसाठी नवी ‘डोनेशन पॉलिसी’ जाहीर केली असून, आता केवळ १०,००० देणगी देणाऱ्यालाही थेट आरतीचा मान मिळणार आहे. तिरुपती बालाजीच्या धर्तीवर तयार केलेली ही योजना उच्च देणगीदार भक्तांसाठी विशेष सुविधा देणार आहे.


याआधी २५,००० देणाऱ्यांनाच आरती व विशेष दर्शनाचा लाभ मिळत होता. मात्र आता ही मर्यादा घटवून १०,००० करण्यात आली आहे. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले की, “देणगीदार भाविकांची सेवा ही आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांच्या मागणीनुसार ही योजना आखली गेली आहे.”



नव्या धोरणात काय मिळणार?




  • १०,००० – ५०,००० देणगी: ५ भाविकांसाठी एक व्हीआयपी आरती




  • ५०,००० – १ लाख: दोन आरत्या व वर्षातून एकदा ५ जणांना मोफत दर्शन




  • १ लाख – १० लाख: दोन VVIP आरत्या व वर्षातून एकदा लाईफटाईम दर्शन




  • १० लाख – १५ लाख: दोन VVIP आरत्या, ५ जणांना वर्षातून एकदा लाईफटाईम VIP दर्शन




  • ५० लाखांहून अधिक देणगी: तीन VVIP आरत्या व वर्षातून दोनदा लाईफटाईम VIP दर्शन




यासोबतच, पंढरपूरच्या धर्तीवर एक नवी अट लागू करण्यात आली आहे. सामान्य दर्शन रांगेत सुरुवातीस येणाऱ्या दोन भाविकांनाही आरतीसाठी प्रवेश दिला जाणार आहे.


या नव्या धोरणामुळे साई भक्तांना सेवा-सुविधा अधिक सुलभ होणार असून, संस्थानला आर्थिकदृष्ट्या बळकटी मिळणार असल्याचं मानलं जात आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या