Pune Rain: पुण्यात अवकाळीने झोडपले, पुढील चार दिवस 'यलो' अलर्ट

पुणे: महाराष्ट्रात अनेक भागात अवकाळी पावसाने कहर केला आहे. कुठे मेघगर्जना, तर कुठे वादळी पाऊस आणि गारपीटमुळे जनसामान्यांची त्रेधातिरपट उडाली आहे.  हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा जारी केला आहे. पुणे शहर आणि त्याच्या परिसरात काल (सोमवार) पासून अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पडत आहे. आज (मंगळवार) देखील शहराच्या मध्यवर्ती भागात पाऊसाची रिमझिम पुणेकरांना (Pune Rain) अनुभववायला मिळत आहे. ऐन उन्हाळ्यात बरसणारा हा पाऊस पुण्यात पुढील ४ दिवस देखील पडणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने (IMD) नोंदवले आहे.


आज सकाळपासून पुणे शहरात ढगाळ वातावरण होते आणि सकाळी ११:३० च्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाला. अचानक झालेल्या पावसामुळे लोकांची प्रचंड धावपळ झाली.



पुण्यात चार दिवस यलो अलर्ट


मे महिन्याच्या गरमीत पुणे शहरात अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे.  त्यामुळे पुणेकरांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. असेच वातावरण पुढील काही दिवस राहणार असून, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुढील चार दिवस पुणे शहरात 'यलो' अलर्ट जारी करण्यात आला आहे.



मुंबईत वादळाचा अंदाज


आज मुंबईच्या पश्चिम उपनगरात सकाळपासूनच पाऊसाला सुरुवात झाली. दरम्यान, आज (मंगळवार) आणि उद्या (बुधवार) मुंबईत 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. ठाणे आणि मुंबईत वादळाचा अंदाज आहे आणि दक्षिण कोकणातही 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.


तर एकंदरीत राज्याचे हवामान पाहिल्यास, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांतील घाट भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद

हाकेंनी जरांगेंसमोर मांडला ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव, म्हणाले...

"पाटील, ९६ कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले नाहीत, तर मग आपल्यात ११ विवाह जाहीर करू": लक्ष्मण हाकेंचा टोला बीड: ओबीसी

पोलिसांनी १२ मुलांना भीक मागण्यापासून वाचवले

शिर्डी: साईबाबा मंदिराच्या धार्मिक स्थळांवर भीक मागण्यासाठी जबरदस्तीने लावलेल्या १२ मुलांना शिर्डी पोलिसांनी

शिर्डीत बाल हक्कांची पायमल्ली? पोलिसांचा कठोर इशारा!

अल्पवयीन मुलांकडून भिक्षा व विक्री करविणाऱ्या पालकांविरोधात गुन्हे दाखल शिर्डी : जगप्रसिद्ध साईबाबांच्या

बीडमध्ये पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू

बीड : बीडच्या (Beed) अंबाजोगाईमध्ये (Ambajogai) पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.