मुंबईकरांची कचऱ्यापासून होणार सुटका

कचऱ्यांच्या गाड्यांसंदर्भात नवीन कंत्राट


मुंबई (वार्ताहर) : कचरा वाहून नेणाऱ्या हिरव्या रंगाच्या गाड्यांच्या जागी आता नव्या रंगसंगतीच्या कचरागाड्या येत्या काही महिन्यात रस्त्यावर दिसणार आहे. मुंबई महापालिकेने कचऱ्याच्या गाड्यांसदर्भात नवीन कंत्राट देण्याचे ठरवले आहे. नव्याने मेणारी वाहने मागील बाजूने झाकलेली असतील. तसेच कचऱ्यातून निघणारे पाणी साठवण्यासाठी यात स्वतंत्र व्यवस्था असेल. त्यामुळे रस्त्यावर पाणी सांडणार नाही, या नवीन गाड्यांची सेवा लवकरच मुंबई महापालिका घेणार आहे.


यामुळे कचरागाडांवर कचरा उचलून टाकणाऱ्या मोटर लोडरला काम उरणार नाही. त्यामुळे त्यांना रस्त्यावरील कचरा झाडण्याचे काम दिले आहे. त्यालाही कामगार संघटनांनी विरोध केला आहे. कचरा संकलन व परिवहन हे अत्यंत महत्त्वाचे काम जर कंत्राटदारांकडून करून घेण्यात आले तर पालिकेला सर्वस्वी कंत्राटदारावर अवलंबून राहावे लागणार आहे. प्रस्तावित योजनेमुळे मोटर लोडर कामगारांचे हक्क बाचित होणार नाहीत अथवा त्यांचे आर्थिक नुकसानही होणार नाही. या कामगारांचे सर्व प्रकारचे आर्थिक लाभ अबाधित राहण्यासोबतच त्यांच्या वारसा हक्कास (पी. टी. केस) बाधा येणार नाही.


तसेच, महापालिकेचे सध्या अस्तित्वात असलेले कोणतेही यानगृह (गॅरेज) बंद केले जाणार नाहीत. - डॉ. अश्विनी जोशी, पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सफेदसह पिवळ्या रंगाच्या गाड्या एकूण वाहनांपैकी सुमारे १० ते १५ टक्के याहने इलेक्ट्रिक स्वरुपाची असणार आहेत. कचरा उचलणे, कचरा पेटीची निगा, परिरक्षण, परिवहन आदी कामासाठी एकच यंत्रणा कार्यरत राहणार आहे. ओला कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांमध्ये कचऱ्यांतून निघणारे सांडपाणी वाहनावच साठविण्याची व्यक्स्था असेल. परिणामी, रस्त्यावर पाणी सांडणार नाही तसेच दुर्गधीही पसरणार नाही. नंतर, या सांडपाण्याची क्षेपणभूमीवर शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा: मुंबई आणि कोकणात जोरदार पावसाचा इशारा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार,

कांदिवलीत उंच इमारतीला आग; आठ जणांना वाचवले

मुंबई : रविवारी सकाळी कांदिवली (पश्चिम) येथील अग्रवाल रेसिडेन्सी या उंच इमारतीत लागलेल्या आगीने परिसरात खळबळ

MPSC 2026 चे वेळापत्रक जाहीर, सविस्तर वाचा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, गुंदवलीवरून थेट गाठता येणार मिरा रोड

मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या गुंदवलीवरून निघालेली मेट्रो दहिसर पूर्व

देशामध्ये २२ बनावट विद्यापीठे

‘यूजीसी’ने जाहीर केली यादी मुंबई  : मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर