आयात शुल्कावरुन अमेरिका आणि भारत यांच्यातील वाद चिघळला

  83

नवी दिल्ली : अमेरिकेने भारताच्या स्टील आणि अॅल्युमिनियमवर २५ टक्के आयात शुल्क अर्थात टॅरिफ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या या निर्णयाविरोधात भारताने जागतिक व्यापार संघटनेकडे नाराजी नोंदवली आहे. तसेच भारताने अमेरिकेच्या उत्पादनांवर आयात शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव जागतिक व्यापार संघटनेकडे पाठवला आहे.

अमेरिकेने देशाच्या सुरक्षेचे कारण देत स्टील आणि अॅल्युमिनियमवर २५ टक्के आयात शुल्क लागू केले आहे. पण या निर्णयामुळे भारत अमेरिकेला निर्यात करत असलेल्या ७७.६ अब्ज डॉलरच्या मालाच्या किंमतीत वाढ होणार आहे. भारतीय उत्पादनांवर थेट १.९१ अब्ज डॉलरचा भार पडणार आहे. भारताच्या निर्यात व्यापारात घट होण्याचा धोका आहे. यामुळे भारताने जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचा आधार घेतला आहे. भारत सरकारने जागतिक व्यापार संघटनेकडे आयात शुल्कांचा नवा प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावानुसार अमेरिकेच्या निर्णयाला उत्तर म्हणून देशहिताच्या रक्षणासाठी भारत अमेरिकेच्या निवडक उत्पादनांवर आयात शुल्क वाढवून नुकसान भरपाई वसूल करणार आहे.

याआधी २०१८ मध्ये अमेरिकेने स्टील आणि अॅल्युमिनियम संदर्भातले स्वतःचे आयात धोरण बदलले होते. त्यावेळी भारताने नुकसान भरपाईसाठी अमेरिकेतून भारतात येणाऱ्या २८ उत्पादनांवर वाढीव आयात शुल्क अर्थात टॅरिफ लागू केले होते.
Comments
Add Comment

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने

पाकिस्तानमधून आरडीएक्सने राम मंदिर उडवण्याचा मेसेज; गुन्हा दाखल

बीड : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्री राम मंदिर उडवण्याचा मेसेज थेट पाकिस्तानातून बीड जिल्ह्यातील एका तरुणाला

मिठीचा गाळ, गोतास काळ; ७,००० पानांचे आरोपपत्र, मोठे मासे सापडणार!

मुंबई पोलिसांकडून मिठी नदी गाळ काढणी घोटाळा उघड ६५.५४ कोटींचा धक्कादायक प्रकार! मुंबई : ६५.५४ कोटींच्या मिठी

सांगा चूक कोणाची? लपवाछपवी कोणासाठी? बीएमसी आणि म्हाडामध्ये घमासान!

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) यांच्यात चांदिवलीतील

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार