म्हाडा यावर्षी जुलैमध्ये काढणार ४ हजार घरांसाठी लॉटरी

म्हाडाच्या कोकण मंडळाकडून लॉटरी


मुंबई : येत्या दिवाळीत म्हाडाची मुंबईमधील पाच हजार घरांसाठी लॉटरी (MHADA Lottery) येणार आहे. यापूर्वी याचवर्षी जुलै महिन्यामध्ये म्हाडाच्या कोकण मंडळाकडून सुमारे चार हजार घरांची बंपर लॉटरी काढली जाणार आहे. यातील सर्वाधिक घरे ठाणे आणि कल्याणमध्ये असणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.


म्हाडातर्फे दरवर्षी राज्यात सुमारे ३० हजार घरांची लॉटरी काढण्याचे नियोजन आहे. त्यानुसार दर तीन ते चार महिन्यांनी म्हाडाच्या विविध मंडळाची लॉटरी निघणार आहे. गेल्या दीड वर्षात म्हाडा कोकण मंडळाने तीन लॉटरी काढल्या असून सुमारे १० हजार जणांचे घराचे स्वप्न साकार केले आहे.


आता जुलै महिन्यात पुन्हा एकदा सुमारे ४ हजार घरांची लॉटरी काढण्याची तयारी कोकण मंडळाने सुरू केली आहे. यात म्हाडाने स्वतः चितळसर येथे उभारलेल्या ११७३ घरांसह हाउसिंग स्टॉकमधून म्हाडाला मिळालेल्या घरांचा देखील समावेश असणार आहे. कल्याण येथे एकाच खासगी विकासकाकडून म्हाडाला अडीच हजार घरे उपलब्ध होणार असून यांचा देखील लॉटरीमध्ये समावेश केला जाणार आहे.



चितळसर येथे म्हाडाने २२ मजली ७ इमारती उभारल्या असून येथील पाण्याचा प्रश्न प्रलंबित असल्याने ठाणे महानगर पालिकेकडून अद्याप या इमारतींना ओसी मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर म्हाडा आणि ठाणे महापालिका अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली असून सदर प्रकल्पासाठी अमृत योजनेंतर्गत महापालिका पाण्याची टाकी बांधणार आहे. तोपर्यंत येथील घरांना पाणी पुरवठा करण्यासाठी तात्पुरती जलवाहिनी टाकली जाणार आहे. त्यानंतर ओसी मिळताच येथील घरांचा लॉटरीमध्ये समावेश केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Comments
Add Comment

नववर्षाच्या स्वागतापूर्वी रात्री रेस्ट्रोबार, पब आणि मॉल्समध्ये विशेष तपासणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने नववर्षाच्या स्वागत आणि गोवा क्लब तसेच कमला मिल प्रमाणे

मुंबईतील एनएससीआयला अग्निशमन दलाची नोटीस

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाच्यावतीने नववर्ष २०२६ च्या स्वागतासाठी

अभासेच्या गीता आणि योगिता गवळी यांनी भरले उमेदवारी अर्ज

दिवसभरात सात जणांनी भरले अर्ज मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने

मुंबई महापालिका निवडणुकीकरता प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण

सोमवार २९ डिसेंबरपासून कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी १० हजार ३०० मतदान केंद्र

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी विधानसभेतील मतदार केंद्राप्रमाणेच केंद्र

'मानवतेच्या मार्गावर चालण्यासाठी कृतीतून संकल्प करू'

मुंबई : शीख पंथीयांचे दहावे गुरू श्री गुरु गोविंद सिंगजी यांचे सुपुत्र साहिबजादे बाबा जोरावर सिंग (वय ९ वर्षे)