दहावीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवार १३ मे २०२५ रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर दुपारी एक वाजता निकाल जाहीर केला जाईल. विद्यार्थ्यांना Digilocker ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका डाऊनलोड करुन ठेवता येईल. परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याची सोय मंडळाने उपलब्ध करुन दिली आहे. मंडळाने दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची तयारी पूर्ण केली आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. आता या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन बघता येणार आहे. शाळांना त्यांचा एकत्रित निकाल शाळेच्या लॉगिनमध्ये पाहता येईल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवरुन निकालाची प्रिंट काढता येईल तसेच निकालाची सॉफ्ट कॉपी डाऊनलोड करुन घेता येईल. निकाल ऑनलाईन उपलब्ध असला तरी पुढील शैक्षणिक वर्षासाठी कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी निकालाची अधिकृत प्रत दाखवावी लागते. यासाठी निकालाची मूळ प्रत विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत मिळणार आहे.

ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या वेबसाईटवर स्वतः अथवा शाळेमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. याकरिता विद्यार्थ्यांना १४ मे पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज भरताना Debit Card/ Credit Card/UPI/Net Banking द्वारे शुल्क भरण्याची सोय आहे.

माध्यमिक प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या (answer sheet) पुनर्मुल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत (photocopy) मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्तीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील.

निकाल पाहण्यासाठी लिंक :

1. https://results.digilocker.gov.in

2. https://mahahsscboard.in

3. http://hscresult.mkcl.org

4. https://results.targetpublications.org
Comments
Add Comment

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री