आनंदाची बातमी! मुंबईतील प्रदूषण घटले, हवेची गुणवत्ता सुधारली

मुंबई : उष्ण आणि धुरकट हवामानानंतर आलेल्या अचानक पावसामुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली असून समीर ॲपवर शनिवारी मुंबईच्या हवा गुणवत्तेची श्रेणी ‘चांगली’ नोंदली गेली. शनिवारी मुंबईचा एकूण हवा निर्देशांक ५६ इतका म्हणजेच चांगल्या श्रेणीत नोंदला गेला. मागील काही दिवसांपासून मुंबईची हवा गुणवत्ता प्रामुख्याने ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली जात होती. दरम्यान, मागील तीन दिवसांपासून मुंबईत पडलेल्या पावसामुळे हवेतील प्रदूषण कमी झाले, धूळ आणि सूक्ष्म कण खाली बसले, आणि हवेतील ओलसरपणा वाढल्याने अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.


हवेची गुणवत्ता सुधारल्याने श्वसनविकार असलेल्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. तरी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. ॲपच्या नोंदीनुसार शनिवारी भायखळा येथील हवा निर्देशांक ३७, माझगाव ५८, कुलाबा ६१, शिवडी ४३, मुलुंड १४, बोरिवली ३६, चेंबूर ३८, घाटकोपर ३०, कांदिवली ३३, अंधेरी ६२ आणि वांद्रे येथे ६३ इतका होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन-तीन दिवस मुंबईत काही भागात ढगाळ, तर काही ठिकाणी कोरडे वातावरण असेल. हवा गुणवत्तेतील ही सुधारणा काही ठराविक कालावधीसाठी कायम राहू शकते. पावसामुळे हवा गुणवत्तेत झालेली सुधारणा ही दीर्घकाळ राहणार नाही, असे मत पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर, वाहनांची योग्य देखभाल, झाडांची लागवड आणि औद्योगिक प्रदूषणावर नियंत्रण हे शाश्वत उपाय महत्त्वाचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.



गोवंडी शिवाजी नगरमधील हवा ‘मध्यम’


गोवंडीमधील शिवाजी नगर परिसरातील हवा सातत्याने खालावली असते. मुंबईत इतर भागातील हवा गुणवत्ता ‘चांगली’ असतानाही शिवाजी नगर येथील हवा गुणवत्ता मात्र शनिवारी ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली गेली. तेथील हवा गुणवत्ता निर्देशांक १११ इतका होता. काही महिन्यांपूर्वी मुंबईची हवा गुणवत्ता खालावली होती तेव्हा सार्वाधिक ‘वाईट’ हवेची नोंद शिवाजी नगरमध्ये झाली होती. त्यानंतरही पालिकेने, तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या उपाययोजनेनंतर येथील हवेत फारसा फरक पडला नव्हता.

Comments
Add Comment

Indian Superfoods : फिट राहायचंय? मग विदेशी नव्हे, आहारात आजच समाविष्ट करा हे देशी सुपरफूड्स

मुंबई : आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अनेक जण चिया सीड्स, क्विनोआ, अवोकाडो, ब्लूबेरी यांसारख्या महागड्या विदेशी

Water Intake : मानवी शरीराला किती पाणी आवश्यक असते; रोज किती पाणी प्यावे? सविस्तर माहिती

तुम्ही दिवसभरात किती पाणी पिता? आपल्या शरीराला किती लीटर पाणी पुरेसे असते, अति प्रमाणात पाणी प्यायल्याने काय

Old Saree Reuse : फेकण्यापूर्वी 10 वेळा विचार करा! जुन्या साडीपासून बनवा घरासाठी 'या' 8 शानदार गोष्टी

तुमच्याही कपाटात जुन्या साड्या पडून आहेत का? त्या फेकून देण्याचा विचार करत असाल, तर आधी एकदा थांबा! कारण या जुन्या

Malegaon : चाळीसगाव फाटा ते शिवतीर्थ नवीन जलवाहिनीस महासभेत मंजुरी

Malegaon : ऐन पावसाळ्यात वारंवार जलवाहिनी फुटल्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत होते. यासंदर्भातील

`Monsoon Health Tips : पावसाळ्यातील सर्व आजारांवर रामबाण उपाय; स्वयंपाक घरातील पदार्थ वापरुन सहज तयार करा

स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या मसाल्यांपासून तयार होणारा औषधी काढा कसा बनवायचा चला पाहूया पावसाळा सुरू

Simhastha Kumbh Mela 2027 : पर्यावरणपूरक कुंभमेळ्याच्या दृष्टीने स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनावर तांत्रिक सल्लागार समितीची चर्चा

Simhastha Kumbh Mela 2027 : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ स्वच्छ, शाश्वत आणि भाविकाभिमुख करण्याच्या दृष्टीने स्वच्छता, घनकचरा