Private Bus Accident: उज्जैन महाकालला जाणाऱ्या खाजगी बस अपघातात महाराष्ट्रातील ३ महिला भाविकांचा मृत्यू

सातारा:  उज्जैन येथे देवदर्शनास चाललेल्या खासगी प्रवासी बस आणि ट्रकचा भीषण अपघात (Private Bus Accident) झाला. या अपघातात तीन महिला भाविकांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी, दि. ११ रोजी फलटण तालुक्यातील सालपे येथील बिरोबा मंदिरासमोर पहाटे २.३० च्या दरम्यान झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सलमा इम्तियाज सय्यद (२४), रजनी संजय दुर्गुळे (४८) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत, तर अन्य आठ जण जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

इचलकरंजी येथील खासगी प्रवासी बस (एमएच ०४ सीपी २४५२) ही भाविक महिलांना घेऊन उज्जैन येथे देवदर्शनास निघाली होती. ही बस वाठार स्टेशन मार्गे सालपे घाट उतरून लोणंद दिशेकडे शनिवारी(दि.१०) मध्यरात्री जात होती. बस बिरोबा मंदिराजवळ आली असता लोणंद बाजूकडून साताऱ्याकडे जाणारा ट्रक (एमएच ४२ बीएफ ७७८४) या दोघांमध्ये धडक होऊन भीषण अपघात झाला.

या घटनेनंतर सालपे ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन भाविकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान लोणंद पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. जखमींना लोणंदच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Comments
Add Comment

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद

हाकेंनी जरांगेंसमोर मांडला ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव, म्हणाले...

"पाटील, ९६ कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले नाहीत, तर मग आपल्यात ११ विवाह जाहीर करू": लक्ष्मण हाकेंचा टोला बीड: ओबीसी

पोलिसांनी १२ मुलांना भीक मागण्यापासून वाचवले

शिर्डी: साईबाबा मंदिराच्या धार्मिक स्थळांवर भीक मागण्यासाठी जबरदस्तीने लावलेल्या १२ मुलांना शिर्डी पोलिसांनी

शिर्डीत बाल हक्कांची पायमल्ली? पोलिसांचा कठोर इशारा!

अल्पवयीन मुलांकडून भिक्षा व विक्री करविणाऱ्या पालकांविरोधात गुन्हे दाखल शिर्डी : जगप्रसिद्ध साईबाबांच्या

बीडमध्ये पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू

बीड : बीडच्या (Beed) अंबाजोगाईमध्ये (Ambajogai) पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.