सीएही रणांगणात: आयसीएआयचा केंद्र सरकारसह लष्कराला पाठिंबा, १४ लाख सदस्य ‘ऑपरेशन सिंदूर’साठी सज्ज

  72

१४ लाखांहून अधिक सदस्य आणि विद्यार्थ्यांना सशस्त्र दल आणि राष्ट्रासोबत एकजुटीने राहण्याचे आवाहन


नवी दिल्ली : पाकिस्तानातील दहशतवादी तळांवरील कारवाईला पाठिंबा दर्शवत इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) या देशातील सर्वात मोठ्या व्यावसायिक संस्थेने केंद्र सरकार आणि भारतीय लष्करासोबत एकजुटीचा निर्धार व्यक्त केला आहे. आयसीएआय अध्यक्ष सीए चरणजोत सिंग नंदा यांनी सांगितले की, संस्थेचे १४ लाखांहून अधिक सीए सदस्य आणि विद्यार्थी ‘ऑपरेशन सिंदूर’ला केवळ शब्दांतच नव्हे तर कृतीतूनही पाठिंबा देतील.


सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर आयसीएआयने सीमावर्ती भागात कार्यरत असलेल्या आपल्या शाखांमार्फत मदतकार्य, स्वयंसेवा, औषधे, रुग्णवाहिका सेवा, रक्तदान आणि अन्नदान शिबिरांचे आयोजन करण्याचा निर्धार केला आहे. आयसीएआयच्या १७७ शाखा देशभरात आणि ४७ देशांमध्ये विस्तारल्या आहेत, ज्यातून ते राष्ट्रीय संकटाच्या काळातही सामाजिक बांधिलकी जपत आले आहेत.



“सीए हे फक्त आर्थिक रक्षक नाहीत, तर राष्ट्रासाठी शक्ती, करुणा आणि लवचिकतेचे आधारस्तंभ आहेत,” असे आयसीएआय उपाध्यक्ष प्रसन्न कुमार डी यांनी सांगितले. संस्थेने मागील युद्ध आणि कोविड काळातही देशसेवा केली असल्याचे उदाहरण देत, यावेळीही "राष्ट्र प्रथम" ही भूमिका घेतली आहे.


इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) ही भारतात चार्टर्ड अकाउंटंट्स व्यवसायाचे नियमन आणि विकास करण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट्स कायदा, १९४९ अंतर्गत संसदेच्या कायद्याद्वारे स्थापन केलेली जगातील सर्वात मोठी लेखा संस्था आहे. पाच रिजनल कौन्सिलसह (प्रादेशिक परिषद) भारतातील १७७ तसेच ४७ देशांमधील ५२ परदेशी शाखा आणि ३३ प्रतिनिधी कार्यालयांमध्ये मिळून ४० हजारहून अधिक सदस्य असे मोठे नेटवर्क असलेली आयसीएआय ही मानवतावादी प्रयत्नांमध्ये महत्त्वपूर्ण प्रभाव पाडण्यासाठी अद्वितीयपणे स्थानावर आहे.

Comments
Add Comment

राहुल गांधींच्या वकिलांचा यु-टर्न: “जीवाला धोका” म्हणणारा अर्ज परत घेणार

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वकिलांनी पुणे येथील न्यायालयात गांधींना वादी

तुमचे ICICI बँकमध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची...

आयसीआयसीआय बँकेचा यूटर्न, बचत खात्यांसाठी किमान शिल्लक मर्यादा केली कमी मुंबई: आयसीआयसीआय बँकेने नुकतीच नवीन

चीनचे परराष्ट्र मंत्री पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर

नवी दिल्ली : डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकन प्रशासनाद्वारे ५० टक्के टॅरिफ लागू करण्यात आल्यावर, चीन आणि

महाराष्ट्रातील १५ सरपंच स्वातंत्र्यदिनी दिल्लीत विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार

९ महिला सरपंचांचा समावेश नवी दिल्ली : राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर १५ ऑगस्ट रोजी

Minta Devi: काँग्रेसची पोलखोल! बिहारमधील '१२४ वर्षीय' मिंटा देवी कॅमेऱ्यासमोर आल्या, काय म्हणाल्या पहा...

बिहार: बिहारमध्ये राहणाऱ्या मिंटा देवीचा फोटो आणि नावाचा वापर करून काँग्रेसने मंगळवारी आंदोलन केले होते. या

Stray Dog Shelter : कुत्र्यांमुळे मृत्यू झालेल्यांना परत आणणार आहात का? सुप्रीम कोर्टाने प्राणीप्रेमींना धरले फैलावर; काय आहेत कोर्टाचे कडक आदेश?

नवी दिल्ली : मुंबईत कबुतरखान्यावरून सुरू असलेला वाद थंड पडलेला नाही, तसेच दुसरीकडे दिल्ली-एनसीआरमध्ये भटक्या