भारतातील ३२ विमानतळांवरील नागरी विमान वाहतूक बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या लढाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय विमानतळ प्राधिकरणाने देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागातील एकूण ३२ विमानतळांवरील नागरी विमान वाहतूक १४ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवत असल्याचे जाहीर केले आहे. या आदेशानुसार अधमपूर, अंबाला, अमृतसर, अवंतीपूर, भटिंडा, भूज, बिकानेर, चंदिगड, हलवारा, हिंडन, जैसलमेर, जम्मू, जामनगर, जोधपूर, कांडला, कांगडा (गग्गल), केशोड, किशनगड, कुल्लू मनाली (भुंटर), लेह, लुधियाना, मुंद्रा, नलिया, पठाणकोट, पटियाळा, पोरबंदर, राजकोट (हिरासर), सारसावा, शिमला, श्रीनगर, थोइस, उत्तरलाई या विमानतळावरुन भारताने नागरी विमान वाहतूक १४ मे रोजी रात्री १२ पर्यंत बंद केली आहे. दिल्ली आणि मुंबई हवाई हद्द विभागात येणारे २५ हवाई मार्ग नागरी विमान वाहतुकीसाठी १५ मे रोजी पहाटे साडेपाचपर्यंत बंद करण्यात आले आहेत. जमिनीपासून अमर्यादित उंचीपर्यंत हे हवाई मार्ग बंद असतील.


भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नागरी विमान वाहतुकीसाठी जारी केलेला बंदी आदेश सर्व नागरी विमान वाहतूक करणाऱ्या विमान कंपन्यांना लागू असेल. सुरक्षित विमान प्रवास आणि विमान प्रवाशांच्या तसेच विमान कंपन्यांच्या हितांच्या रक्षणासाठी हा बंदी आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचे बंधन सर्व नागरी विमान वाहतूक करणाऱ्या विमान कंपन्यांवर लागू असेल. बंदी आदेश तात्पुरता असून परिस्थितीचा अंदाज घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केले आहे.

Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

अरे बापरे! देशभरात २२ बनावट विद्यापीठे

यूजीसीकडून देशातील २२ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) देशातील २२ बनावट

फक्त ६ वर्षांच्या मुलांनाच पहिलीत प्रवेश

दिल्ली सरकारने पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा केली निश्चित नवी दिल्ली  : दिल्ली सरकारने शालेय शिक्षणात एक

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या  : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे पुढील सरन्यायाधीश! चार दशकांहून अधिक अनुभव असणारे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या कार्याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

नवी दिल्ली: देशाचे विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सरन्यायाधीश हा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही

राम मंदिराच्या दर्शनाची वेळ बदलली , जाणून घ्या अयोध्यातील दर्शनाची वेळ...

अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिर म्हणजे श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम. दिवसेंदिवस प्रभू रामाचे दर्शन