Dagdu Sheth Ganesh Temple: भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडू शेठ हलवाईची सुरक्षा वाढवली

मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्यानंतर, भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखीनच वाढला आहे. ज्याचे रूपांतर आता युद्धात झाले असून, भारताच्या अनेक महत्वपूर्ण शहर आणि ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ज्यामध्ये पुण्याच्या दगडू शेठ हलवाई मंदिरा (Dagdusheth Halwai Temple) चा देखील समावेश आहे.

हे मंदिर पुण्यातील सर्वात प्रशस्त आणि मानाचे धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर १०० वर्षांहून अधिक जुनं आहे,  या मंदिरात दररोज अनेक भाविक गर्दी करत असतात. त्यामुळे युद्ध परिस्थिती दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून, मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.


दगडूशेठ मंदिर परिसरात स्पेशल पोलीस विभागाचे कमांडो तैनात


पुण्यातील दगडूशेठ मंदिर परिसरात स्पेशल पोलीस विभागाचे कमांडो तैनात करण्यात आले आहेत. तसेच  दंगल नियंत्रण पथक देखील  सज्ज करण्यात आले आहेत. भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभुमीवर विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

 
Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक