IPL 2025 स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित

नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली आहे. केंद्र सरकार आणि बीसीसीआय चर्चा केली आणि हा निर्णय घेतला. सध्या तणावामुळे सुरक्षा पथकांवर कामाचा ताण आहे. यामुळेच आयपीएल २०२५ स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय झाला आहे.





आतापर्यंत आयपीएलचे ५८ साखळी सामने झाले होते. गुजरात टायटन्स पहिल्या, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दुसऱ्या, पंजाब किंग्स तिसऱ्या, मुंबई इंडियन्स चौथ्या, दिल्ली कॅपिटल्स पाचव्या, कोलकाता नाईट रायडर्स सहाव्या, लखनऊ सुपर जायंट्स सातव्या, सनरायझर्स हैदराबाद आठव्या, राजस्थान रॉयल्स नवव्या आणि चेन्नई सुपरकिंग्स दहाव्या स्थानावर आहे.


यंदाच्या आयपीएलमध्ये ७० साखळी सामने, दोन पात्रता सामने अर्थात क्वालिफायर, एक बाद फेरीचा सामना अर्थात एलिमिनेटर आणि अंतिम सामना अर्थात फायनल असे एकूण ७४ सामने खेळवण्याचे नियोजन होते. यापैकी ५८ वा साखळी सामना सुरू असतानाच धरमशाला येथे ब्लॅकआऊट करण्यात आले. खेळाडूंना सुरक्षितरित्या हॉटेलवर पाठवण्यात आले. प्रेक्षकांनाही स्टेडियम सोडून शांतपणे घरी जाण्याचे आवाहन करण्यात आले. यानंतरच आयपीएल २०२५ वर अनिश्चिततेचे सावट घोंगावत होते. अखेर आयपीएल २०२५ स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय झाला.


भारत-पाकिस्तान यांच्यातील सुरू असलेल्या संघर्षामुळे ८ मे बुधवारी पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना मध्येच रद्द करण्यात आला. धमरशालाचे हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम रिकामे करण्यात आले. खेळाडूंना धरमशाला येथून दिल्लीला आणण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली. बीसीसीआयने खेळाडू आणि सहयोगी स्टाफसाठी वंदे भारत एक्सप्रेसची व्यवस्था केली होती.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026 : जाणून घ्या न्यूझीलंडच्या कर्णधाराला भारतीय संघाबद्दल काय वाटते

- अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडच्या कर्णधाराने केले जसप्रीत बुमराहचे कौतुक मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक

वर्ल्ड कप फायनलसाठी अभिषेक ‘आऊट’, रिंकू सिंग ‘इन’?

मुंबई (प्रतिनिधी) : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी अभिषेक शर्माने केलेली हवा फुसकी निघाली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या ७

टी-२० वर्ल्डकप कुणीही जिंकला तरी शेवटी इतिहासच घडणार!

मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. या

भारत-न्यूझीलंड महामुकाबल्यासाठी ऑनलाइन बुकींगला गर्दी

मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करत

All England Open : लक्ष्य सेनची दमदार आगेकूच, उपांत्यपूर्व फेरीत धडक

ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय शटलर लक्ष्य सेनची शानदार कामगिरी सुरूच आहे. पहिल्या फेरीत माजी जागतिक

रविवारी मोदी स्टेडियमवर भारत - न्यूझीलंड फायनल रंगणार, सेमी फायनलमध्ये भारताचा विजय

मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चौकार-षटकारांचा पाऊस पडला. भारताच्या २५३ धावांना इंग्लंडकडूनही सडेतोड