पाकने केला 5 भारतीय विमाने पाडल्याचा दावा, पण पुरावा देताना बोबडीच वळली

जम्मू आणि काश्मीर: भारतीय लष्कराने पाकिस्तानात आणि पाकव्याप्त काश्मीरात 7 मे च्या पहाटे, नऊ कुख्यात दहशतवाद्यांचे तळ नामशेष केले. या हल्ल्यानंतर दोन्ही देशांकडून याविषयी माहिती देण्यात येत आहे. ज्यामध्ये, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये भाषण केलं. तेव्हा ते म्हणाले, पाकिस्तानचं सैन्य या हल्ल्याला तोंड देण्यासाठी आधीपासूनच तयार होतं. भारताने खरेदी केलेल्या राफेल विमानावर खूप गर्व केला, पण जास्त गर्व करायचा नसतो, कारण आम्ही भारताची 5 विमाने पाडली, ज्यात 3 राफेल आहेत, " असा दावा त्यांनी केला. पण याचा ठोस पुरावाच पाककडे नाही.


ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये जनतेला संबोधित करताना, शरीफ पुढे म्हणाले, "हवाई दल प्रमुख जहिर बाबर यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी भारताच्या राफेल विमानांचं कम्युनिकेशन लॉक केलं. 80 विमानांच्या माध्यमातून भारतानं 6 ठिकाणी हल्ले केले. आम्ही त्यांची 3 राफेल विमानं पाडली."



खरंच पाकिस्ताननं भारताचं विमान पाडलं का?


ऑपरेशन सिंदूरने 9 दहशतवादी स्थळे उद्भवस्त केल्यानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तान करत असलेला हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे आता समोर येत आहे. सीएनएला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा शरीफ आसिफ यांनी पाकिस्तानने पाच भारतीय विमाने पाडल्याच्या त्यांच्या दाव्याचे श्रेय सोशल मिडियावरील पुराव्यांवर दिले. पाच भारतीय विमाने पाडल्याच्या दाव्याचे पुरावे मागीतले असताना त्यांनी सांगितले की, "ही सर्व सोशल मिडियावर आहे, भारतातील सोशल मिडियावर त्याची माहिती आहे, पाकिस्तानच्या सोशल मिडियावर ते दिसत नाही." इतकेच नव्हे यानंतर ते असे ही म्हणाले की, भारतीय विमानांची अवशेष काश्मीरमध्ये पडले आहेत. लढाऊ विमाने कशी पाडली आणि कोणती उपकरणे वापरली गेली याबद्दल अधिक माहिती देखील त्यांना देता आली नाही.


दरम्यान पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये केलेल्या भाषणात पाक पंतप्रधान यांनी पहलगाम हल्ला खेदजनक आहे आणि पाकिस्तानचा या हल्ल्याशी दूरदूरपर्यंत संबंध नाही, असे म्हंटले आहे. आम्ही एका आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी केली होती, त्या चौकशीला आम्ही सहकार्य करण्याची ऑफर दिली, पण भारताने ती ऑफर मानली नाही, अशी मुक्ताफळं उधळली.


Comments
Add Comment

मुंबई झोपडपट्टीमुक्तीसाठी सरकारचे मोठे पाऊल!

मुंबईत ५० एकरपेक्षा मोठ्या भूखंडांवर राबवणार 'क्लस्टर रिडेव्हलपमेंट'; पहिल्या टप्प्यात १७ प्रकल्पांची निवड

भंडारा अवैध वाळू उपसा प्रकरणी एसडीओ निलंबित

निवृत्त तहसीलदारांवरही होणार गुन्हा दाखल घोटी-त्र्यंबक रस्ता बाधितांसाठी ३ दिवसांत बैठक; विधानसभेत महसूल

डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एका धक्का- भारतावरील टॅरिफ वाढ रद्दच व्हावी यासाठी युएस धोरणकर्त्यांचीच न्यायालयात धाव

प्रतिनिधी: डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक झटका स्वगृही मिळाला आहे. भारतासह इतर देशावर लावलेल्या भरमसाठ

राज्यात २६ जानेवारीपासून 'मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना'; मंत्री नितेश राणेंची मोठी घोषणा

मत्स्यपालनात आता 'एआय'चा वॉच! उत्पादनावर नजर ठेवण्यासाठी 'मार्वल'शी करार नागपूर: राज्यातील मच्छिमार समाजाला

ना घरका ना घाटका ! ट्रम्पविरोधात युएसमध्येच असंतोष, एच१बी व्हिसा निर्णयावर फेडरल न्यायालयात धाव

मुंबई: ना घरका ना घाट का अशी परिस्थिती डोनाल्ड ट्रम्प यांची झालेली दिसते. भारतासह इतर देशावर देशहिताच्या

डहाणू जमीन घोटाळा प्रकरणी तलाठी, मंडल अधिकारी निलंबित निवृत्त महसूल अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीला चाप

४ गुंठ्याचे ४० गुंठे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा नागपूर :