Operation Sindoor : पाकव्याप्त काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सिंदूर'!

पाकिस्तानची दोन लढाऊ विमाने नष्ट


देशभरात मॉकड्रील करण्यापूर्वीच भारताने पहलगाम हल्ल्याचा सूड उगवलाय. पाकिस्तान झोपेतून उठण्यापूर्वीच भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वी करत नऊ दहशतवादी ठिकाणांवर स्ट्राईक केलं. तिन्ही दलाने केलेल्या संयुक्त कारवाईमुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलंय.


पहलगाममधील दहशतवाही हल्ल्याचा भारताने बदला घेतलाय. भारताचे सैन्य दल, वायुसेना आणि नौसेना यांनी संयुक्त कारवाई करत दहशतवादी हल्ल्याचा सूड उगवलाय. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलंय. भारताने दहशतवाद्यांचे ९ तळ उदध्वस्त करत चांगलाच धडा शिकवलाय.


?si=UzwCJT1tGF5znFeb

भारताने दहशतवाद्यांच्या एकूण ९ ठिकाणांवर हल्ला केलाय. बहावलपूर, मुझफ्फराबाद, कोटली, मुरीदके, गुलपूर, भिंबर, चक अमरू आणि सियालकोट या ठिकाणांवर स्ट्राईक केलाय. बहावलपूर आणि कोटली हे दहशतवाद्यांचे मोठे अड्डे आहेत. भारताच्या स्ट्राईकमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तळांना मोठा फटका बसलाय. वायुदलाने केलेल्या अचूक हल्ल्यामुळे दहशतवाद्यांना पळता भुई थोडी झालीय. पहलगाम हल्ल्याला भारताने सडेतोड उत्तर दिल्याने पाकिस्तान बिथरलंय.



पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईला भारताने ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलंय. पहलगाममधील हल्ल्यात दहशतवाद्यांनी नवविवाहित जोडप्यांना लक्ष केलं होतं. याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं आणि ते यशस्वी करून दाखवलं.'सिंदूर'हे नाव हिंदू विवाहित स्त्रियांचे प्रतीक मानलं जातं. त्याचबरोबर योद्ध्यांसाठीही ते गौरवाचे चिन्ह आहे. सिंदूर हे योद्ध्यांचेही प्रतीक आहे. पूर्वी युद्धात जाण्यापूर्वी योद्धा कपाळावर सिंदूरचा टिळा लावत असत.


भारतीय वायुसेना आणि सैन्य दल यांनी एकत्रित ही कारवाई केली. यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर येतेय. इतकंच नव्हे तर पाकिस्तानची दोन लढाऊ विमानंही नष्ट करण्यात आली आहेत. एफ 16 आणि एफ 17 आकाशात नष्ट करण्यात आलीत. आकाश मिसाईलने पाकिस्तानच्या दोन्ही लढावू विमानांना लक्ष केलंय. भारताने आखलेल्या आणि यशस्वी केलेल्या ऑपरशेन सिंदूर मोहिमेचं तमामा भारतीयांनी स्वागत केलंय. भारताने पुन्हा एकदा स्ट्राईक करून जगाचं लक्ष वेधलंय आणि पाकिस्तानला इशारा दिलाय.

Comments
Add Comment

कोस्टल रोडच्या जोड रस्त्यांच्या बांधकामातील अडथळे दूर, जोड रस्त्याचे काम पूर्ण होताच लोखंडवाला, सात बंगल्यातील नागरिकांचा प्रवास सुकर

मुंबई (खास प्रतिनिधी) : कोस्टल रोड (उत्तर)ला जोडल्या जाणाऱ्या अतिरिक्त पुलाच्या जोडणीचे काम मागील दीड वर्षांपासून

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

प्रसिद्धी, पैसा आणि नावापासून दूर जाऊन ही प्रसिद्ध अभिनेत्री जगतेय संन्यासी आयुष्य!

मुंबई : अभिनय क्षेत्रात प्रसिद्धी आणि यश मिळवणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. त्यासाठी काही कलाकार मोठा

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल