पाकिस्तानमधील हवाई संरक्षण यंत्रणा भारताच्या ड्रोन हल्ल्यात उद्ध्वस्त

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये २६ नागरिकांची हत्या केली. नंतर भारताने ७ मे रोजी पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांच्या विरोधात 'ऑपरेशन सिंदूर' केले. यानंतर संतापलेल्या पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पाकिस्तानचा हल्ला परतवल्यानंतर भारताने भर दिवसा ८ मे रोजी पाकिस्तानमध्ये ठिकठिकाणी ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यात पाकिस्तानमधील हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमे लाहोर, कराचीसह वेगवेगळ्या महत्त्वाच्या शहरांमध्ये ड्रोन दिसल्याच्या आणि स्फोट झाल्याच्या बातम्या देत आहेत.





पाकिस्तानने ०७ मे - ०८ मे २०२५ च्या रात्री अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नाल, फलोदी, उत्तरलाई आणि भूज यासह उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी लक्ष्यांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. इंटिग्रेटेड काउंटर यूएएस ग्रिड आणि एअर डिफेन्स सिस्टमने हे लक्ष्य निष्क्रिय केले. पाकिस्तानच्या हल्ल्यांचे ठोस पुरावे भारताच्या हाती आहेत.


पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर म्हणून भारताने गुरुवार ७ मे रोजी भर दिवसा हवाई संरक्षण यंत्रणेला लक्ष्य करुन कारवाई केली. भारताच्या कारवाईत लाहोरमधील लाहोर येथील हवाई संरक्षण प्रणाली नष्ट झाली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पूंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने मोर्टार आणि जड तोफखान्यांचा वापर करून विनाकारण गोळीबाराची तीव्रता वाढवली आहे.


पाकिस्तानी गोळीबार आणि तोफांच्या माऱ्यात आतापर्यंत तीन महिला आणि पाच मुलांसह सोळा निष्पाप लोकांचे प्राण गेले आहेत. पाकिस्तानकडून होणारा गोळीबार आणि तोफांचा मारा थांबवण्यासाठी भारताने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.


पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

भारतात पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यात गुरुवार ८ मे रोजी रात्री नऊ वाजल्यापासून ते शुक्रवार ९ मे रोजी पहाटे पाच वाजेपर्यंत असा रात्रभर ब्लॅकआऊट असेल. या ब्लॅकआऊटची घोषणा प्रशासनाने थोड्या वेळापूर्वीच केली आहे.
Comments
Add Comment

आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी

दिल्लीमधील सरकारने दिले आदेश नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे देशातील अनेक शहरांमधील लोक त्रस्त

काश्मिर खोरं गोठलं! तापमानात विक्रमी घसरण

श्रीनगर: हिवाळ्यात अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात. गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी डिसेंबर

गुजरात एटीएसची छापेमारी! राजस्थानातून जप्त केले २२ किलो ड्रग्ज

राजस्थान: राजस्थानमधून ड्रग्ज तस्करीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील भिवाडी इथे गुजरात

नववर्षाच्या स्वागतासाठी सुरक्षा दलांचे 'कवच' तैनात!

काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट' घाटीत थरकाप उडवणारी थंडी, पण सुरक्षा यंत्रणा अलर्ट जम्मू-कश्मीर : नववर्षाच्या

सेना-नौदल-वायुसेनेची ताकद वाढणार

८० हजार कोटींच्या संरक्षण खरेदीला केंद्राची मंजुरी नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या

छत्तीसगडमध्ये अनेक ठिकाणी ईडीचे छापे

रायपूर : भारतमाला प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करताना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात झालेल्या अनियमिततांच्या