तापमान वाढल्याने आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ

मुंबई अग्निशमन दलाने दिला सावधानतेचा इशारा


मुंबई (प्रतिनिधी): सध्या मुंबईसह संपूर्ण देशात उष्णतेच्या लाटेचा प्रकोप मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. एकूणच, तापमानात लक्षणीय वाढ होत असल्याने विजेच्या उपकरणांवर ताण येऊन परिणामी घर, कार्यालये व औद्योगिक परिसरात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत मुंबईकर नागरिकांनी खबरदारी घ्यावी, त्यामुळे सावधगिरी हा सर्वोत्तम उपाय आहे, ही भावना लक्षात घेऊन नागरिकांनी जबाबदारीने वागावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलामार्फत करण्यात येत आहे.


उष्णतेच्या लाटेमुळे तापमान वाढून विजेच्या वाहिन्या (इलेक्ट्रिक वायरिंग) गरम होणे, शॉर्टसर्किट होणे, गॅस गळतीच्या घटनांना सुरुवात होणे, पंखे, वातानुकूलित मंत्रणा, फ्रिज व इतर उपकरणांचा अतिवापर आणि त्या अनुषंगाने वीज वापरावरील ताण या साऱ्यांमुळे आगीच्या घटनांचा धोका अधिक वाढतो. या पाश्र्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारितील अग्निशमन सेवा, नागरिक सुरक्षा आणि गृहरक्षक महासंचालनालयाने १ मे २०२५ रोजी परिपत्रक प्रसारित केले आहे.


या अनुषंगाने मुंबई अग्निशमन दलातर्फे नागरिकांना उष्णतेच्या लाटेमध्ये घ्यावयाच्या खबरदारीबद्दल आवाहन करण्यात येत आहे. मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी सातत्याने प्रशिक्षण व सज्जता राखली जाते. तरीही मुंबईतील कोट्यवधी नागरिकांनी जर खबरदारी घेतली, तर आग लागण्यासारख्या घटनांमध्ये लक्षणीय घट होऊ शकते, असे प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर यांनी नमूद केले आहे.


मुंबईकरांनी घरात काय घ्यायला हवी काळजी


घरगुती व व्यावसायिक ठिकाणांवरील विजेची वायरिंग, प्लग, स्विच बोर्ड्स आणि उपकरणांची नियमित तपासणी करावी.


जुन्या किवा जीर्ण वायरिंगची आवश्यक असल्यास तज्ज्ञाच्या मदतीने दुरुस्ती करावी. आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी लागणारे सर्व मार्ग (जीने, प्रवेशद्वार) कायम मोकळे ठेवावेत.


एकाय प्लग संकिटमध्ये अनेक विद्युत उपकरणे लावणे टाळावे, वातानुकूलित (AC) यंत्रणेची नियनित देखभाल (maintanace) करणे आवश्यक आहे. घरात, दुकानात किंवा कार्यालयात किमान एक 'फायर एक्सटिंग्विशर' ठेवावा आणि त्याचा योग्य वापर शिकून घ्यावा.


रुग्णालये, नर्सिंग होम, क्लिनिक्स यांनी आवश्यक ती अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित ठेवून वेळेवर 'फायर सेफ्टी ऑडिट' करणे बंधनकारक आहे.


कोणतीही आग लागल्यास वेळ न दवडता १०१ या आपात्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा.

Comments
Add Comment

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील

मुंबईत महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून केले अभिनंदन

राज्यभरातील २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीच अव्वल मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक ठरलेल्या मुंबई

Raj Thackeray : भावाशी युती करूनही राज ठाकरेंच्या खात्यात २२ शून्य, मुंबईत 'मनसे'ला जबरदस्त धक्का; ठाकरे ब्रँड फेल!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी २० वर्षांचा वनवास संपवून एकत्र आलेल्या 'ठाकरे बंधूं'साठी आजचा निकाल

तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांचा प्रचंड मतांनी दणदणीत विजय

वार्ड ४७ मध्ये तरुणाईचा विजयघोष मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक ४७ मधून भारतीय जनता पक्षाचे