Ujjain Mahakal Temple: बाबा महाकाल मंदिर परिसरात भीषण आग, खूप प्रयत्नानंतर आग आटोक्यात

मध्य प्रदेश: उज्जैनच्या महाकाल मंदिर (Ujjain Mahakal Temple) परिसरात अचानक मोठी आग लागल्याचे वृत्त आहे.  सोमवारी सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास मंदिराच्या शंख द्वारजवळ आगीच्या ज्वाळा दिसून आल्या, आणि काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. या घटनेमुळे संपूर्ण मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली.


मिळालेल्या माहितीनुसार, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. खूप प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली.  मंदिर परिसरात आग लागल्याची माहिती मिळताच उज्जैनचे जिल्हाधिकारी आणि एसपी देखील घटनास्थळी उपस्थित राहिले. घटनास्थळी  मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. मात्र, आतापर्यंत कोणत्याही जीवितहानीबद्दल कोणतीही बातमी नाही.



प्रदूषण मंडळाचा नियंत्रण कक्ष जळून खाक


मिळालेल्या माहितीनुसार, ज्या परिसरात ही आग लागली, त्या परिसरात प्रदूषण मंडळाचा नियंत्रण कक्ष होता. या आगीत प्रदूषण मंडळाचा नियंत्रण कक्ष पूर्णपणे जळून खाक झाला आहे.


आग लागण्याचे नेमके कारण अद्याप कळलेले नसले तरी, मिळालेल्या माहितीनुसार आगीचे कारण शॉर्ट सर्किट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संदर्भात पोलिस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Mumbai News : धक्कादायक! वाढदिवसाच्या केकमध्ये आढळली पाल, 11 जणांना विषबाधा; 4 जण ICUमध्ये

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील लक्ष्मी नगर परिसरातील निळकंठ अपार्टमेंटमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान

Antara Banerjee : अभिनेत्री अंतरा बॅनर्जीला अटक; ट्रेनमध्ये आरपीएफ जवानांवर केला रेझरने हल्ला

मुंबई : मॉडेल आणि वेब सिरीज अभिनेत्री अंतरा बॅनर्जी (३१) हिला १२ ऑगस्ट रोजी अरवली एक्सप्रेसमध्ये जागेचे आरक्षण

Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला

Auto Rickshaw : ऑटो-टॅक्सी चालकांना मराठीचे ज्ञान अनिवार्य; नियम न पाळल्यास तीन टप्प्यांत कारवाई

मुंबई : राज्यातील ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 18 ऑगस्टपासून कामापुरते मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा