SRH vs DC, IPL 2025: हैदराबाद-दिल्लीच्या सामन्यात पावसाचा खोडा, हैदराबाद प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५चा ५५वा सामना आज सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगला होता. मात्र हा सामना अर्धवटच राहिला. पावसाने या सामन्यात खोडा घातल्याने अर्धवट सामना रद्द करावा लागला. सामना रद्द झाल्याने हैदराबादचा संघ मात्र प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे.


दिल्लीच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ विकेट गमावत १३३ धावा केल्या होत्या.दिल्लीकडून आशुतोषने सर्वाधिक ४१ धावा केल्या होत्या. तर कमिन्सने ३ विकेट मिळवल्या होत्या. मात्र हैदराबादची फलंदाजी सुरू होण्यापूर्वीच पाऊस कोसळू लागला. बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतरही पाऊस थांबला नाही आणि सामना रद्द करावा लागला.



असा होता दिल्लीचा डाव


पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या दिल्लीची सुरूवात खराब राहिली. सामन्याच्या पहिल्या बॉलवर कमिन्सने करूण नायरने विकेट मिळवली. यानंतर दिल्लीचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. तिसऱ्या षटकात पुन्हा कमिन्सने फाफ डू प्लेसिसला बाद केले. प्लेसिसने केवळ ३ धावा केल्या. यानंतर ५व्या षटकांत हर्षलने अभिषेक पोरेलला बाद केले. सहाव्या षटकांत अक्षऱला बाद केले.


आठव्या षटकांत जयदेवने केएल राहुलला बाद केले. यानंतर स्टब्स आणि विप्रज यांच्यात भागीदारी होत होती. मात्र १२व्या षकांत विप्रज धावबाद झाला. त्याने केवळ १८ धावा केल्या. यानंतर स्टब्स आणि आशुतोष यांनी दिल्लीचा डाव सांभाळला. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या आशुतोषने २६ बॉलमध्ये ४१ धावा ठोकत दिल्लीचा शंभरीपार नेले. त्याने २ चौकार आणि ३ षटकार ठोकत ही खेळी केली.

Comments
Add Comment

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Kedar Jadhav : क्रिकेटच्या पिचवरून राजकारणाच्या मैदानात; केदार जाधवला भाजपमध्ये मिळाली मोठी जबाबदारी!

Mumbai : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एका नव्या भूमिकेत झळकणार आहे.

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो