मुंबईची 'मटका क्वीन' पुन्हा अडचणीत! गोव्यात सापडली, पतीच्या हत्येनंतरही जुगार साम्राज्य चालवत होती!

पणजी : एका सिनेमात शोभेल अशी तिची कहाणी... पतीची हत्या, आजन्म कारावासाची शिक्षा, पुन्हा जामिनावर बाहेर येऊन जुगाराचा साम्राज्य चालवणं... आणि आता पुन्हा अटक. 'मटका क्वीन' जया छेडाची कहाणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.


गोवा मटका नेटवर्कचा पर्दाफाश करत गोवा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पणजी, मापुसा, वास्को, मडगाव, पोंडा, मांड्रे अशा अनेक भागांत धडक मारत पोलिसांनी १२ मटका प्रकरणांमध्ये १२ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये मुख्य नाव पुन्हा समोर आलं आहे ते म्हणजे मुंबईची 'मटका क्वीन' जया छेडा. एकेकाळी पतीच्या हत्येच्या कटात सहभागी असलेली ही महिला आता पुन्हा जुगाराच्या प्रकरणात अडकली आहे.



पोलिसांच्या एफआयआरमध्ये उल्लेख झाल्याप्रमाणे, जया छेडा मुंबईमधून 'मटका'चा मुख्य नेटवर्क ऑपरेट करत होती. तिच्या बरोबरच चंदुभाई ठक्कर आणि घनश्याम भाई हे गुजरातमधील डीलर असून अहमदाबादमधून शाखा चालवत होते. म्हणजेच जया छेडा हे या आंतरराज्यीय जुगार रॅकेटचं ब्रेन होतं.



जया छेडा कोण?


जया छेडा हे नावच मटका विश्वात खळबळ उडवणारं आहे. या क्षेत्राची सुरुवात कल्याणजी भगत यांनी केली होती. त्यांचे पुत्र सुरेश भगत यांनी मटक्याचं साम्राज्य फुलवलं, मात्र २००८ साली एका कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला. तपासात उघड झालं की हा अपघात नव्हता, तर त्यांची पत्नी जया छेडानेच ही हत्या घडवून आणली होती, केवळ मटका साम्राज्यावर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी!


या प्रकरणात जया छेडाला आजन्म कारावासाची शिक्षा झाली होती, मात्र २०१८ मध्ये तब्येत खालावल्यामुळे तिला जामिनावर सोडण्यात आलं. पण २०२२ मध्येही तिचं नाव पुन्हा जुगार प्रकरणात आलं होतं.


आता पुन्हा जया छेडा गोव्यात अडकली आहे आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडली आहे. गोवा पोलिसांचं म्हणणं आहे की, मटका व्यवसाय पूर्णपणे उखडून टाकण्याचा आमचा निर्धार आहे आणि या प्रकरणात सहभागी सर्व आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाईल.

Comments
Add Comment

मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिलांचा गरबा

मुंबई: बोरिवली आणि चर्चगेट दरम्यान मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये महिलांनी गरबा खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला

एसटीच्या मोबाईल ॲपला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) मोबाईल ॲपला अलीकडे प्रवाशांकडून वाढती पसंती मिळत असून सध्या या ॲप चे

राज्य सरकारचा पूरग्रस्तांना मोठा दिलासा: मृतांच्या कुटुंबियांना ४ लाख, गुरांसाठीही मदत

मुंबई: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर,

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावला लालबागचा राजा

मुंबई : महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी नवरात्रौत्सवाचा उत्साह आहे, त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग

शाहरुख व गौरी खानविरुद्ध मानहानीचा खटला, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात!

मुंबई: प्रसिद्ध चित्रपट अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांच्या विरोधात मुंबईचे माजी पोलीस अधिकारी

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांना ट्रोलर्सची पर्वा नाही, म्हणतात, त्यांना त्यासाठी पैसे मिळतात..

अमृता फडणवीस यांची परखड मुलाखत! मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी आणि गायिका अमृता