Ind vs Pak : मुहूर्त ठरला! ७ मे रोजी देशभरात... गृह मंत्रालयाचे आदेश

सर्व आपत्कालीन यंत्रणांना तत्पर ठेवण्याचे निर्देश


PM मोदींचा मेगाप्लॅन


नवी दिल्ली : पाकिस्तानच्या पापाचे घडे आता भरले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पूर्णपणे वाढला आहे. पाकिस्तानवर कोणत्याही क्षणी मोठ्या लष्करी कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठीचं आता भारतानं चांगलीच कंबर कसली आहे. या निमित्ताने केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना ७ मे रोजी मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन किती सज्ज आहे, याची चाचणी घेण्यासाठी हा मॉक ड्रिल घेतला जाणार आहे. राज्यांनी पोलिस, नागरी संरक्षण यंत्रणा, आरोग्य विभाग आणि अन्य आपत्कालीन सेवांशी संबंधित यंत्रणांना तत्पर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मॉक ड्रिलमध्ये बॉम्बस्फोट, शस्त्रधारी हल्ले आणि नैसर्गिक आपत्ती यांसारख्या विविध परिस्थितींचा समावेश असणार आहे.





मॉक ड्रीलमध्ये काय होणार?


गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार, नागरिकांचे संरक्षण आणि आपत्कालीन परिस्थितींमध्ये योग्य प्रतिसाद देण्यासाठी या गोष्टींवर सराव होणार आहे.




  •  हवाई हल्ल्याचा अलर्ट दिल्यास सायरन वाजवणे

  •  नागरिक व विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे प्रशिक्षण देणे

  • हल्ल्याच्या वेळी शहर/क्षेत्र ‘ब्लॅकआउट’ करणे (लाईट बंद ठेवणे)

  • महत्त्वाच्या स्थापत्यांनाच लपवण्याची प्रक्रिया

  •  हल्ला झाल्यास नागरिकांची तातडीने स्थलांतर प्रक्रिया व त्याचा सराव


नागरिकांना सहकार्याचं आवाहन


केंद्रीय गृहमंत्रालयाने ७ मे ला देशभरात सिव्हिल डिफेन्सचं मॉक ड्रिल करण्याचे निर्देश सर्व राज्यांना दिले आहे. संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय आहे. एअर रेड सायरन्सची चाचणी केली जाणार आहे. सर्वसामान्य, विद्यार्थ्यांना संरक्षणाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. मॉक ड्रिलमध्ये घेतल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या उपाययोजना करण्यात आली आहे. सरकारकडून नागरिकांना सहकार्याचं आवाहन करण्यात आले आहे.



मॉक ड्रिलने धोका नाही


ही मॉक ड्रिल पूर्णतः सरावासाठी असून प्रत्यक्ष धोका नसल्याचं प्रशासनाने स्पष्ट केले आहे. युद्धजन्य परिस्थितीत काय करावं याची जाणीव नागरिकांना करून देणं हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर पंजाबमधील फिरोजपूर छावणीत ४ मे रोजी ३० मिनिटांचा ब्लॅकआउट ड्रिल पार पडला. रात्री ९ ते ९.३० या वेळेत लाईट बंद ठेवून युद्धाच्या परिस्थितीतील सज्जतेचा आढावा घेण्यात आला.



भारताचं पाकविरुद्धात मोठं पाऊल


पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण खात्याचे सचिव राजेश कुमार सिंह यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी पंतप्रधान मोदी नौदल आणि हवाई दलाच्या प्रमुखांना भेटले होते. त्यामुळे संरक्षण खात्याचे सचिव आणि पंतप्रधानांची बैठक महत्त्वाची मानली जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी भारतीय लष्कराला कारवाईची मोकळीक दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत एखादी महत्त्वाची घटना घडणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.



पहलगामच्या हल्ल्यात २६ निष्पापांचा बळी


पहलगामच्या हल्ल्यात २६ निष्पापांचा बळी गेलाय. या हल्ल्याचं उत्तर आजवरचं सर्वात मोठं उत्तर असेल हे भारताने स्पष्ट केलंय. तणावाच्या पार्श्वभूमीवर सध्या भारत पाकमध्ये शाब्दिक आणि राजकीय वॉर रंगलंय. आजवरच्य़ा कारवायांमधून भारताने पाकचे दात नेहमीच घशात घातलेत त्यामुळे आत्ता देशवासीय वाट पहात आहे पुढच्या स्ट्राईकची, पाकीस्तान आणि दहशतवाद्यांचं कंबरडं मोडण्याची... त्याची भारतीय सैन्य ज्या प्रकारे तयारी करीत आहे त्यावरून नक्कीच काही तरी मोठं होणार आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही.

Comments
Add Comment

Viral News : गर्लफ्रेंडसाठी काय पण...! प्रेमात आंधळा झाला मुलगा; घरातच केली लाखोंची चोरी, करामत पाहून पोलीसही चक्रावले

आसाम : आसाममधील जोरहाट येथे कुटुंबाच्या घरातील लॉकर फोडून तब्बल ५० लाख रुपये रोकड आणि मौल्यवान वस्तू चोरी

Hyderabad Vijayawada Highway Accident : साखरझोपेतच काळाचा घाला! हैदराबाद-विजयवाडा हायवेवर खाजगी बस ट्रकला धडकली; ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू

हैदराबाद : हैदराबाद-विजयवाडा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला. तेलंगणातील सूर्यापेट

Bank Holiday Today : आज देशातील 'या' राज्यांमध्ये बँका बंद; RBI Holiday List तपासा

नवी दिल्ली : बँकेच्या शाखेत जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी आज बँका सुरू आहेत की बंद हे तपासून

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण