आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी आर्थिक गुप्तचर विभागाची स्थापना

मुंबई :केंद्र सरकारप्रमाणे आता राज्य सरकारही आर्थिक गुप्तचर विभाग स्थापन करणार आहे. बँक घोटाळ्यांचा पर्दाफाश, गुन्हेगारी नेटवर्क आणि आर्थिक फसवणूक रोखण्याची जबाबदारी या विभागावर सोपविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पुढाकाराने हे युनिट तयार केले आहे.


राज्यासह देशात सायबर गुन्हे वाढीस लागले आहेत. यावर निर्बंध आणण्यासह ऑनलाईन फसवणुकीला चाप लावण्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५ दरम्यान प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री कदम यांनी आर्थिक गुप्तचर युनिट स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार हा विभाग स्थापन करण्यात आला आहे.




मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा अंतर्गत आर्थिक गुप्तचर युनिटचे नेतृत्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकाऱ्याकडे सोपवले जाणार आहे. २ सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक आणि ८ पोलीस कर्मचारी यांचे सहकार्य त्यांना दिले जाईल. तसेच इकोनॉमिक इंटेलिजन्स युनिट नागरिकांच्या रोजच्या जीवनात दिसून न येणारी; परंतु अत्यंत महत्त्वाची आर्थिक सुरक्षा कवच पुरवण्यातही युनिट काम करणार आहे. त्यामुळे गुन्हेगारी आर्थिक साखळी उद्ध्वस्त करण्यास
मदत होईल.

Comments
Add Comment

Sunetra Pawar : 'दादांचे प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राचे स्वप्न सर्वांच्या साथीने पूर्ण करायचे आहे'

पुणे : दादांनी (अजित पवार) तुम्हाला आणि मला दिलेला हा जो विकासाचा वारसा आहे तो वारसा अर्ध्यावर सोडून देणे हे

Meghna Sakore Bordikar : 'परभणी गुंतवणूक परिषदेतून १,६०० कोटींची गुंतवणूक; स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी'

परभणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात परभणी जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण

Suman Kale Murder Case : पारधी समाजाच्या सुमन काळे हत्या प्रकरणात राज्य शासनाची नव्याने एसआयटी; विशेष तपास पथक गठित

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील पारधी समाजातील सुमन काळे यांच्या सन २००७ मधील संशयास्पद पोलिस कोठडीतील मृत्यू

Ashish Shelar : दहिहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये घेऊन जाणार, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे दहिहंडी उत्सवाला युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत नेण्यासाठी प्रयत्न करीत

Prakash Abitkar : गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभे करण्याचे नियोजन रुबी हॉल क्लिनिक

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या