पद्मश्री विजेत्या योगगुरू स्वामी शिवानंद यांचे वाराणसी येथे १२९ व्या वर्षी निधन

वाराणसी : प्रसिद्ध योगगुरू आणि पद्मश्री पुरस्कार विजेते स्वामी शिवानंद सरस्वती यांचे रविवार ४ मे रोजी १२९ व्या वर्षी निधन झाले. ते तपस्वी जीवनशैली आणि आध्यात्मिक ज्ञानासाठी तसेच योग क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी प्रसिद्ध होते. पंतप्रधान मोदींसह सार्वजनिक जीवनातील अनेक दिग्गजांनी, शिवानंद सरस्वती यांच्या शिष्यांनी आणि स्थानिकांनी दिवंगत स्वामी शिवानंद सरस्वती यांना आदरांजली वाहिली.



स्वामी शिवानंद सरस्वती यांनी योग क्षेत्रात अतुलनीय कार्य केले शिवाय वंचितांसाठी आयुष्य वेचले. योग आणि मानवतावादी कार्यातील योगदानासाठी २०२२ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौविण्यात आले होते. स्वामी शिवानंद त्यांच्या साधेपणा, शिस्त आणि भक्तीसाठी ओळखले जात. आयुष्यभर त्यांनी स्वतःची कामं स्वतःचं करणं पसंत केलं. ते १२९ व्या वर्षीही योगासने करत होते.

स्वामी शिवानंद बाबा १२९ वर्षे जगले. आम्ही १९९८ पासून त्यांना भेटत होतो. ते एक महान आत्मा होते जे सर्वांना समानतेने वागवत होते. १२९ व्या वर्षी त्यांनी असे योग केले जे आमच्या वयाचे लोकही करू शकत नाहीत; असे धर्मेंद्र सिंह टिंकू म्हणाले. टिंकू हे स्वामी शिवानंद सरस्वती यांचे शिष्य आणि मागील अनेक दशकांपासूनचे स्वामींचे शेजारी आहेत. स्वामीजी भेदभाव न करता सर्वांना अभिवादन करायचे. ते कधीही कोणावर अवलंबून नव्हते. साधे, स्वावलंबी आणि शिस्तीचे जीवन जगण्यावर त्यांनी भर दिला, असेही धर्मेंद्र सिंह टिंकू म्हणाले.

स्वामी शिवानंद सरस्वती यांनी योग साधना केली. तसेच गरीब, कुष्ठरोगी, वंचित यांच्या कल्याणासाठी आयुष्यभर काम केले; असे स्वामींचे अनुयायी परिमल मुखर्जी म्हणाले.
Comments
Add Comment

गोव्यात नाईटक्लबमध्ये अग्नितांडव, २५ जणांचा मृत्यू; चौघांविरोधात FIR, मॅनेजरला अटक

पणजी : उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील 'बिर्च बाय रोमियो लेन' या नाईटक्लबमध्ये रविवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या

कारवाई का करू नये ? केंद्र सरकारची 'इंडिगो'ला नोटीस

नवी दिल्ली : इंडिगो एअरलाइन्समधील ऑपरेशनल संकट दूर करण्यासाठी आणि सामान्य परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी

प्लास्टिकवर प्रक्रिया करून तरुण बनला करोडपती

कचऱ्याचे रूपांतरण संपत्तीत दिल्ली : दिल्लीतील एका तरुणाने प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक नवीन

भारताला खुणावतेय रशियन बाजारपेठ

२०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातले

जगभरातील बालमृत्यूच्या घटनांमध्ये भारत दुसऱ्या स्थानी

नवी दिल्ली : जगभरात जवळपास १० लाख मुले पाच वर्षांचे वय गाठण्याआधीच मृत्युमुखी पडली. कुपोषणाशी संबंधित घटक-जसे की

२००९ पासून अमेरिकेतून १८,८२२ भारतीय हद्दपार

मंत्री एस. जयशंकर यांची राज्यसभेत माहिती नवी दिल्ली : अमेरिकेने २००९ पासून एकूण १८,८२२ भारतीय नागरिकांना हद्दपार