पाकिस्तानी अभिनेत्रीचे फोटो पाहण्यासाठी भारतीय चाहत्यांनी केलं असं काही की...

मुंबई : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर पावले उचलली आहेत. यामध्ये भारतात अनेक लोकप्रिय असलेल्या पाकिस्तानी कलाकारांची आणि खेळांडूची सोशल मिडिया अकाऊंट ब्लॉक करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना मोठा फटका बसत आहे. अशातच काही पाकिस्तानी कलाकारांचे भारतात देखील मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत. यांची अकाऊंट ब्लॉक झाल्याने भारतीय चाहत्यांना त्यांच्या आवडीच्या कलाकारांचे व्हिडीओ फोटो पाहण्यासाठी त्यांनी आता नवीन युक्ती शोधली आहे.


आज जेव्हा एखादा भारतीय सोशल मिडिया युजर त्याच्या आवडीच्या कोणत्याही पाकिस्तानी सेलिब्रिटीच्या अकाऊंट शोधतो, तेव्हा त्याला 'भारतात खाते उपलब्ध नाही' असं नोटीफिकेशन मिळतं. पण काही चाहत्यांनी हार मानली नाही. त्यांनी त्यांच्या आवडत्या कलाकाराला फॉलो करण्यासाठी नव्या गोष्टींचा शोध घेत आहेत. भारतात या पाकिस्तानी कलाकारांची अकाउंट ब्लॉक असली तरी, त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट वापरण्यासाठी अनेक चाहते VPN म्हणजेच व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क वापरत आहेत.


ज्या पाकिस्तानी कलाकारांचे अकाउंट चाहते VPN च्या मदतीने अॅक्सेस करत आहेत, त्यांच्या यादीत पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरचे नाव देखील अग्रस्थानी आहे. भारतीय चाहते हानिया आमिरच्या अकाउंटवर 'मिस यू', 'काळजी करू नकोस, आम्ही व्हीपीएन वापरुन आलो आहोत', 'आमच्याकडे तुमच्यासाठी व्हीपीएन आहे' अशा कमेंट करत आहेत. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना प्रेमाने उत्तर देणारी हानिया त्या कंमेटला उत्तर देत म्हणते- मी रडेन.


भारतीय चाहते तिचे खाते अॅक्सेस करण्यासाठी आणि तिचे कंटेंट पाहण्यासाठी VPN वापरत असल्याबद्दल हानियाने आनंद व्यक्त केला. एका चाहत्याने हानियाच्या पोस्टवर कमेंट केली, "तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलं आहे? तुम्ही इतका चांगला, वेडा आणि भावनिकदृष्ट्या जोडलेला तगडा चाहता वर्ग तयार केला आहे की ते तुम्हाला स्क्रीनवर पाहण्यासाठी भारतात VPN कनेक्शन खरेदी करत आहेत."

Comments
Add Comment

फेडरल बँकेच्या निव्वळ नफ्यातील ४.७% वाढीनंतर शेअरमध्ये 'इतकी' तुफान वाढ

मोहित सोमण: फेडरल बँकेचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या

पनवेल महापालिकेसाठी मतमोजणी सुरू

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या

डहाणू पारनाका-कुरगाव सागरी महामार्गाचा कायापालट

आता डांबरीकरण नव्हे, 'काँक्रिटीकरण' होणार डहाणू : डहाणू आणि पालघर तालुक्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या सागरी

वसई-विरारमधील ७ लाख मतदारांचा कौल कुणाला

महायुती, बहुजन विकास आघाडीत टक्कर विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार महापालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी मतदान

२९ महापालिकांत महायुतीचाच महापौर

रवींद्र चव्हाण यांचा ठाम विश्वास कल्याण : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपचे

कल्याण-डोंबिवलीत ४०.०७ टक्के मतदान

मतदानाचा टक्का घसरला; दुपारी वेग वाढला कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत मतदान प्रक्रियेत