रशियाकडून भारताला मिळाली इग्ला - एस क्षेपणास्त्र

नवी दिल्ली : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत - पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराला रशियन बनावटीच्या इग्ला-एस या खांद्यावरुन चालवता येणार्‍या हवाई संरक्षण क्षेपणास्त्रांचा नवा साठा (कन्साईनमेंट) मिळाला आहे. या क्षेपणास्त्रांमुळे जमिनीवर, जंगलात, बोटीत किंवा डोंगराळ भागात उभे राहून थेट विमानाचा किंवा हेलिकॉप्टरचा वेध घेणे शक्य आहे. केंद्राने सैन्याला दिलेल्या आपत्कालीन खरेदी अधिकारांतर्गत केलेल्या कराराचा भाग म्हणून इग्ला-एस क्षेपणास्त्रांचा नवीन पुरवठा प्राप्त झाला आहे.


भारतीय लष्कराने २६० कोटी रुपयांत नव्या इग्ला-एस क्षेपणास्त्रांचा साठा खरेदी केला आहे. ही क्षेपणास्त्र दिवस असो वा रात्र, उन - पाऊस - वादळ - वारा अशा कोणत्याही वातावरणात आणि कोणत्याही वेळी शत्रुच्या विमानाचा किंवा हेलिकॉप्टरचा वेध घेण्यास सक्षम आहेत. भारतीय हवाई दलानेही आधुनिक इग्ला-एस क्षेपणास्त्रांचा साठा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. लष्कराने तर नवा साठा खरेदी करतानाच आणखी इग्ला-एस क्षेपणास्त्रांची ऑर्डर दिली आहे. या अंतर्गत ४८ लाँचर्स आणि ९० क्षेपणास्त्र खरेदी केली जाणार आहेत. सध्याचे इग्ला-एस क्षेपणास्त्र इन्फ्रा रेड सेन्सरच्या मदतीने शत्रूवर हल्ला करण्यास सक्षम आहे. भारतीय सैन्य आता लेझर बीमच्या मदतीने आणखी अचूक आणि वेगवान असा हल्ला करुन शत्रू सैन्याला नामोहरम करण्याची योजना आखत आहे. यासाठी भारत लेझर मार्गदर्शक इग्ला-एस क्षेपणास्त्र खरेदी करण्याचा विचार करत आहे.


इग्ला क्षेपणास्त्राची पहिली आवृत्ती १९९० च्या सुमारास रशियाच्या सैन्याने वापरली. यानंतर सातत्याने या क्षेपणास्त्रात सुधारणा केल्या जात आहेत. आता या क्षेपणास्त्राची इग्ला-एस ही अतिशय आधुनिक आवृत्ती तयार करण्यात आली आहे. हे अत्याधुनिक क्षेपणास्त्र भारताने खरेदी केले आहे. भारतातल्याच एका कंपनीने जुन्या आवृत्तीच्या क्षेपणास्त्रांच्या विद्यमान साठ्याचे नूतनीकरण करुन दिले आहे. भारतीय सैन्य मोठ्या संख्येने हवाई संरक्षण यंत्रणा खरेदी करणे आणि सज्ज ठेवणे यावर भर देत आहे. लष्कराने स्वदेशी इंटिग्रेटेड ड्रोन डिटेक्शन अँड इंटरडिक्शन सिस्टीम मार्क १ तैनात केली आहे. ही यंत्रणा आठ किमी अंतरावरील ड्रोन शोधून त्यावर प्रतिहल्ला करू शकते. ड्रोन नष्ट करू शकते. या प्रणालीत लेझरच्या मदतीने ड्रोन जाळण्याचीही यंत्रणा आहे.आर्मी एअर डिफेन्स युनिट्सने अलीकडेच जम्मू प्रदेशातील १६ व्या कॉर्प्सच्या हद्दीत लेझरच्या मदतीने शत्रुचा ड्रोन जाळण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे.

Comments
Add Comment

जयपूर SMS हॉस्पिटलच्या ICU मध्ये भीषण आग, ६ रुग्णांचा मृत्यू

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूर येथील सवाई मानसिंह (SMS) हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरच्या न्यूरो आयसीयू (ICU)

दार्जिलिंगमध्ये भूस्खलनाने हाहाकार; २३ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उत्तर बंगालच्या दौऱ्यावर

दार्जिलिंग: पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या भीषण

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन