आसाम : पाकिस्तान समर्थक ३७ देशद्रोह्यांना अटक

दिसपूर: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी २६ हिंदूंच्या ‘टार्गेट किलींग’नंतर देशभरात संतापाची लाट उसळली असतानाच आसाममध्ये पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या ३७ देशद्रोहींना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विटरवर (एक्स) याबाबत माहिती दिली.


मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले की, पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या देशद्रोह्यांवर कारवाई सुरू आहे. आतापर्यंत एकूण ३७ देशद्रोहींना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. सर्व देशद्रोह्यांवर कठोर कारवाई केली जाईल. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पहलगाम हल्ल्यानंतर काही लोक सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून पाकिस्तानला पाठिंबा देणारी विधाने करत होते.

या विधानांना गांभीर्याने घेत, आसाम पोलिसांनी तपास सुरू केला आणि आतापर्यंत राज्याच्या विविध भागातून ३७ जणांना अटक केली आहे. आसाम सरकार कोणतेही देशविरोधी वर्तन सहन करणार नाही. देशाच्या एकता आणि अखंडतेशी छेडछाड करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच कुणीही देशविरोधी टिप्पणी किंवा कृती केल्याचे आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे. राज्यात शांतता आणि सुरक्षा राखली जावी आणि कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी विचारांना प्रोत्साहन दिले जाऊ नये, असा सरकारचा हेतू असल्याचेही त्यांनी ठणकावले आहे.

Comments
Add Comment

सोनिया गांधी रुग्णालयात

नवी दिल्ली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल

Hydrabad Crime : अमेरिकेत हैदराबादच्या लेकीची निर्घृण हत्या; संशयित माजी रूममेट भारतात पळाला, तामिळनाडूत अटक

हैदराबाद : अमेरिकेतील मेरीलँड राज्यात डेटा आणि स्ट्रॅटेजी ॲनालिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या निकिता गोडिशला (वय

चोरीसाठी शिरला, पण नशीब फिरलं! दोन दिवस भिंतीत अडकलेला चोर, VIDEO व्हायरल

चोरीसाठी चोर कोणत्या थराला जाऊ शकतो, याचा काही अंदाज नाही. मात्र राजस्थानमध्ये चोरा सोबत असं काही घडलं की त्याला

लाल किल्ल्याजवळील स्फोटप्रकरणात एनआयएचा तपास वेगात; नऊ आरोपी अटकेत

नवी दिल्ली : लाल किल्ला स्फोट प्रकरणातील आरोपी यासिर अहमद दार याची कोठडी १६ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.

पहिले स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाज ‘समुद्र प्रताप’ तटरक्षक दलाच्या ताफ्यात

जहाज आधुनिक अग्निशमन क्षमतांनी सुसज्ज; कोचीत राहणार तैनात पणजी : जहाजबांधणी आणि सागरी क्षमता विकासात

उमर खालिदला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : दिल्लीत २०२०च्या दंगलींशी संबंधित एका महत्त्वाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निर्णय