Dombivli : डोंबिवली रेल्वे स्थानकातील रखडलेल्या सरकत्या जिन्याच्या कामाला प्रारंभ

डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्र .३ आणि ४ वरील रखडलेल्या सरकत्या जिन्याच्या कामाला रेल्वे प्रशासनाने सुरूवात केली आहे. मागील सहा महिन्यांपासून हे काम रखडल्याने फलाटावरील प्रवाशांना वळसा घेऊन जिन्यावर जावे लागत होते. तसेच या कामामुळे फलाटाचा भाग अरूंद झाला होता.


फलाटावर वावर करणे प्रवाशांना मुश्किल झाले होते. डोंबिवली रेल्वे स्थानक मध्य रेल्वे स्थानकावरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून ओळखले जाते. या रेल्वे स्थानकातील वाढत्या गर्दीचा विचार करून रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक १ ते ५ क्रमांकाला जोडणारा पादचारी पूल फलाटाच्या मध्यभागी सुरू केला. या सुविधा सुरू असताना डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्र. ३ आणि ४ वर कल्याण बाजूकडे मागील सहा महिन्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने या भागात प्रवाशांना उतरण्यासाठी असलेला जिना तोडून टाकला.



त्या जागी सरकत्या जिन्याच्या कामासाठी खड्डा आणि फलाटावर त्या कामाच्या ठिकाणी चारही बाजुने संरक्षित पत्रे लावले होते. हे काम लवकरच पूर्ण होईल अशी रेल्वे प्रवाशांना अपेक्षा होती. फलाट क्रमांक ३ आणि ४ वर कल्याण दिशेने उतरण्यासाठी जिना नसल्याने प्रवाशांना दक्षिण बाजूच्या जिन्याने जाऊन पुन्हा माघारी येऊन फलाटावर कल्याण दिशेकडे जावे लागत होते.


हा वळसा घेताना प्रवाशांची दमछाक होत होती. फलाट क्र.३ आणि ४ वर मुंबईला जाणाऱ्या आणि कर्जत, कसारा, अंबरनाथ, खोपोलीकडे जाणाऱ्या जलद लोकल धावतात. या दोन्ही बाजूकडील लोकल एकावेळी फलाटावर आल्या की कल्याण बाजूकडील भागात गर्दी होत होती. प्रवाशांमध्ये रेटारेटी होत होती.कल्याण दिशेने उतरलेला प्रवासी फलाटावर दक्षिण दिशेने चालत जाऊन तेथून जिन्यावर
जात होता.

Comments
Add Comment

वाहनांच्या फिटनेस चाचणीसाठी १० पट जास्त शुल्क

ट्रकपासून बाईकपर्यंत २,५०० वरून थेट २५,००० रुपये नवी दिल्ली : केंद्र सरकारने रस्ते वाहतूक आणि महामार्ग

रशिया भारताला एसयू - ५७ लढाऊ विमाने देणार

मॉस्को : रशियाने भारताला एसयू-५७ स्टेल्थ लढाऊ विमाने पुरवण्यास सहमती दर्शवली आहे. रशियन कंपनी रोस्टेकचे सीईओ

पाणी भरण्याच्या वादातून तोंडावर 'स्प्रे' मारलेल्या व्यक्तीचे निधन

विरार  : पाणी भरण्याच्या क्षुल्लक वादातून एका महिलेने आपल्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर मच्छर

गृहनिर्माण धोरणात भाडेतत्त्वावरील घरांना प्राधान्य

म्हाडाच्या विकासकांना १०० टक्के मालमत्ता कर माफ' मुंबई  : मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हबअंतर्गत म्हाडाने

मुंबईतील १२ मेट्रो स्थानकांवर स्मार्ट लॉकर सुरू

मुंबई : भारताच्या सार्वजनिक वाहतूक इकोसिस्टमसाठी निर्बाध डिजिटल पेमेंट्स आणि सेवा सक्षम करणाऱ्या ऑटोपे पेमेंट

पाकिस्तानवरील हवाईक्षेत्र रोखले गेल्याने एअर इंडिया आर्थिक अडचणीत

पहलगाम घटनेनंतर संबंध विकोपाला गेल्याचा फटका नवी दिल्ली  :  पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे