Pune Water Shortage : पुणेकरांवर पाणीबाणी! आठवड्यातून एक दिवस पाणी बंद

पुणे : मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उकाडा (Heat) वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असल्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होताना दिसून येत आहे. अशातच नागरिकांना पाण्याची कमतरता भासत असून पाणीटंचाईचा (Water Crisis) देखील सामना करावा लागत आहे. ऐन उन्हाळ्यात पुणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. (Pune Water Shortage)



पुणे महापालिकेने शहराच्या दक्षिण भागात पाणीकपात करण्यास सुरुवात केली आहे. या भागातील पाणीपुरवठा आता आठवड्यातून एक दिवस बंद ठेवला जाणार आहे. त्याचबरोबर कात्रज, कोंढवा, भारती विद्यापीठ या भागांमध्ये गेल्या दीड महिन्यापासून दर मंगळवारी पाणीपुरवठा बंद ठेवला जात होता. त्यावर आता महापालिका प्रशासनाने पाणीकपातीचे वेळापत्रक प्रसिद्ध करून शिक्कामोर्तब केले आहे.


पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितल्यानुसार, वडगाव बुद्रुक पाणीपुरवठा केंद्रातून कात्रज, आंबेगाव, धायरी, तसेच सिंहगड रस्त्यावरील भागात पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या भागासाठी उपलब्ध होणारे पाणी कमी पडत असल्याने कात्रज परिसरातील पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी पाणीपुरवठा विभागाकडे आल्या आहेत. या सर्व भागांमध्ये पुरेशा दाबाने पाणी देण्यासाठी आता आठवड्यातून एक दिवस वेगवेगळ्या भागांतील पाणी बंद ठेवले जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या सोमवारपासून (५ मे) केली जाणार आहे. या भागात चक्राकार पद्धतीने पाणी दिले जाणार आहे. (Pune Water Shortage)



कधी आणि कुठे असणार पाणीपुरवठा बंद?



  • सोमवार : बालाजीनगर, श्रीहरी सोसयाटी, गुरुदत्त सोसायटी, साईकृपा सोसायटी, पवार रुग्णालय, कात्रज परिसर, कोंढवा, साईनगर, शांतीनगर सोसायटी, महानंदा सोसायटी, श्रीकृष्ण काॅलनी.

  • मंगळवार : संपूर्ण सन सिटी परिसर, माणिकबाग, समर्थ नगर, मधुकर हाॅस्पिटल परिसर, विठ्ठलवाडी, जुनी धायरी, बारंगणी मळा, पारी कंपनी रस्ता, राजस सोसायटी कात्रज, निरंजन सोसायटी, कमला सिटी, कोंढवा खडी मशीन चौक, सिंहगड महाविद्यालय, हब टाउन सोसायटी, कोलते पाटील सोसायटी.

  • बुधवार : वडगाव बुद्रुक, वडगाव हिंगणे, जाधवनगर, वडगाव गावठाण, जाधवनगर, हिंगणे, महादेवनगर, राजीव गांधी वसाहत, कात्रज वाघजाईनगर, सुखदा-वरदा सोसायटी, आंबामाता मंदिरामागील परिसर, सिल्व्हर ओक सोसायटी, सुखसागर नगर, स्वामी समर्थनगर.

  • गुरुवार : धनकवडी गावठाण, बाळकृष्ण सोसायटी, सौदागर सोसायटी, राजमुद्रा सोसायटी, चित्तविहारी सोसायटी, अक्षयनगर, दौलतनगर, कलानगर, गुलाबनगर, चैतन्यनगर, तळजाई पठार, सन्मित्र सोसायटी, सागर सोसायटी, सहकारनगर भाग १, दाते बसस्टॉप, सुखसागरनगर भाग १, निलया सोसायटी, महादेवनगर भाग – २, कोंढवा, गोकुळनगर, वृंदावननगर.

  • शुक्रवार : आंबेगाव पठार, दत्तनगर भुयारी मार्ग, त्रिमूर्ती चौक, भारती विद्यापीठ, जोगेश्वरीनगर, मोरे-निंबाळकर वस्ती, भारतनगर, दत्तनगर. आगम मंदिर संतोषनगर वंडर सिटी परिसर, साईनगर, कोंढवा बु. (गावठाण), कपिलनगर, लक्ष्मीनगर, आचल फार्म.

  • शनिवार : कात्रज गाव, गुजरवाडी फाटा, अखिल नवीन वसाहत कात्रज, राजीव गांधी वसाहत, ग्रीन पार्क, अजमेरा पार्क.

  • रविवार : कात्रज महादेवनगर भाग १, आनंदनगर, महावीर नगर, शिव प्लाझा पिसोळी रस्ता, पारगे नगर, आंबेडकरनगर, पुण्यधाम आश्रम रस्ता. (Pune Water Shortage)

Comments
Add Comment

Free School Bag: राज्यसरकारच्या मोठा निर्णय! १ ते ८ विच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर

मुंबई: राज्यसरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांना

Grishneshwar temple : शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! महाशिवरात्रीला घृष्णेश्वराचे 'गाभारा दर्शन' सुरूच राहणार

वेरूळ : महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरातील दर्शनाबाबत प्रशासनाने

Ambernath traffic: महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथच्या वाहतुकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्गांबद्दल

अंबरनाथ : महाशिवरात्री उत्सवानिमित्त अंबरनाथमधील प्राचीन अंबरेश्वर शिवमंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर

ISRO Science Trip: अंतराळ संशोधन क्षेत्रात ग्रामीण विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी इस्रो विज्ञान सहल

- विज्ञान प्रेरणा अभियानांतर्गत आश्रमशाळेतील १०० विद्यार्थी सहलीत सहभागी होणार मुंबई : इतर मागास बहुजन कल्याण

NCP Merger: शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून मोठा दावा, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचं नेतृत्व अजित पवारांकडे...

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला असतानाच,

Pune: बांगलादेशच्या झेंड्यावरून फूड स्टॉल्सची तोडफोड; पुण्यातील MIT कॉलेजमध्ये राडा

पुणे: पुण्यातील कोथरुड येथील एमआयटी महाविद्यालयात आयोजित वर्ल्ड कल्चरल फेस्टिवलमध्ये मोठा राडा झाला आहे. फूड