बिंदास कुहूच्या भूमिकेत जाई

युवराज अवसरमल


जाई खांडेकर अभिनयाच्या क्षेत्रात हळूहळू आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. ‘भूमिका’ या नाटकात ती सचिन खेडेकर व समिधा गुरू यांच्या मुलीची भूमिका साकारीत आहे.


भांडुपच्या पवार पब्लिक स्कूलमध्ये तिचे शालेय शिक्षण झाले. तिथे सांस्कृतिक कार्यक्रमात तिला जास्त भाग घेता आला नाही. नंतर तिने सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. तिथे तिने इतिहासामध्ये पदवी घेतली. मल्हार या फेस्टिवलमध्ये तिचा सक्रिय सहभाग होता त्या वेळी ती त्या कार्यक्रमाची वीसीपी होती. एथका या थिएटर फेस्टिवल मध्ये तिने भाग घेतला होता. होप्स नावाच्या एकांकिकेचे लेखन व दिग्दर्शन तिने केले. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित मन शुद्ध तुझं या मालिकेमध्ये तिने काम केले.


भूमिका या नाटकातील एका पात्रासाठी तिची निवड झाली. या नाटकातील तिच्या भूमिकेविषयी विचार असता ती म्हणाली की, या नाटकात माझी कुहू नावाच्या मुलीची भूमिका आहे. मी आधुनिक विचाराची आहे. ती नवीन पिढीची प्रतिनिधित्व करते. ती बिंदास आहे. ती आताच्या प्रश्नावर बोलणारी आहे. सचिन खेडेकर व समिधा गुरुची ती कन्या दाखविली आहे. हे नाटक माझ्या जीवनातील टर्निंग पॉइंट आहे.


ती या नाटकाचे सारे श्रेय दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णीना देते. त्यांनी मोठ्या अभ्यासाने तिचे मूव्हमेंट बसविले आहेत. त्यांनी दिलेल्या विश्वासमुळेच ती ही भूमिका यशस्वीरीत्या साकारू शकली. सचिन खेडेकर व समिधा गुरु हे अनुभवाने तिच्यापेक्षा सीनियर आहेत; परंतु त्यांच्यामध्ये मित्रत्वाचे नाते निर्माण झाले आहे. त्यांच्यामध्ये चांगला रेपो निर्माण झाला आहे. रंगमंचावरचा वावर, संवादफेक ही त्यांना पाहून, त्यांचे मार्गदर्शन मिळून ती शिकली.


सध्या प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया तिला या नाटकातील भूमिकेविषयी मिळत आहे. एक कलाकार म्हणून घडण्याची प्रक्रिया तिच्यामध्ये सुरू आहे. वेगवेगळ्या चांगल्या भूमिका साकारण्याची तिची इच्छा आहे. वेगवेगळ्या चांगल्या दिग्दर्शकाकडे काम करण्याची देखील तिची इच्छा आहे. भूमिका नाटकासाठी व भविष्यातील वाटचालीसाठी तिला
हार्दिक शुभेच्छा!

Comments
Add Comment

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेने येसूबाई म्हणून ओळख दिली

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल  इतिहासाची साक्ष आणि वर्तमानाचा संघर्ष यांची सांगड घालणारा 'भिडेवाडा' हा चित्रपट

सरपंच-उपसरपंचांची जुगलबंदी रंगणार

शशांक शेंडे आणि ओंकार भोजने आमने-सामने गावच्या राजकारणात सरपंच आणि उपसरपंच यांच्यातील नोक-झोक नेहमीच चर्चेचा

कलाकारांची चैतन्यमय गुढी...

राजरंग : राज चिंचणकर पली संस्कृती, परंपरा आपल्या सण आणि उत्सवांत अधिक उजळून निघते. नववर्षाचा शुभारंभ करत चैतन्य

‘दशावतारा’तील प्रागतिक बदल

पाचवा वेद : भालचंद्र कुबल ‘दशावतारी नाटकांसदर्भात मी तीन लेख पाचव्या वेदातून प्रसिद्ध केले होते. त्याबाबत अनेक

‘तिघी’ चित्रपटासाठी निर्माती म्हणून संधी : नेहा पेंडसे

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल  नेहा पेंडसे-बायस या चतुरस्त्र अभिनेत्रीने अभिनयाचे नाणं खणकावत अभिनयाच्या

‘महोगाथा’चा प्रयोगशील अध्याय...!

राजरंग : राज चिंचणकर मराठी रंगभूमीवर विविध प्रकारच्या नाटकांची प्रयोगशील मांडणी होत असते. मनोरंजनाच्या सोबतच