कर्नाटकमध्ये हिंदुत्ववादी नेता सुहास शेट्टीची चाकूने भोसकून केली हत्या

  125

मंगळुरू : कर्नाटकमध्ये हिंदुत्ववादी नेता सुहास शेट्टीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना घडल्यापासून दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मंगळुरूत तणावाचे वातावरण आहे. परिस्थितीचा अंदाज येताच कायदा - सुव्यवस्था राखण्यासाठी मंगळुरूतील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.


सुहास शेट्टीची हत्या झाल्यानंतर उल्लालमधील फैझल, कोंचाडीमधील मोहम्मद लुकमान आणि कन्नूरच्या इरशादवर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जखमी झालेल्यांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. मंगळुरूचे पोलीस तपास करत आहेत.


सुहास शेट्टी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी गुरुवारी रात्री उडुपी तालुक्यातील अथराडी येथे एका मुसलमान तरुणाची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हल्लेखोरांनी चालक अबू बक्करच्या ऑटोरिक्षाचा रस्ता अडवला. नंतर हल्लेखोरांनी तलवारी आणि बाटल्यांनी त्याच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. अबू बक्कर पळून गेला आणि हिरियाडका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हिरियाडका पोलीस ठाण्याने तात्काळ कारवाई करत दोघांनाही अटक केली. आरोपी सुशांत आणि संदेश पुजारी यांना अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण एनआयएकडे सोपवावे अशी मागणी होत आहे.


सुहास शेट्टीच्या हत्येनंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारला आहे. यामुळे मंगळुरूत तणाव आहे. पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे.

Comments
Add Comment

हिमाचल प्रदेश : नैसर्गिक आपत्तीमुळे ६३ जणांचा मृत्यू, ४० बेपत्ता

राज्यात भूस्खलन, ढगफुटी आणि पुरामुळे भीषण परिस्थिती शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु

'ऑपरेशन सिंदूर'च्या निमित्ताने भारत तीन देशांशी लढला

नवी दिल्ली : 'ऑपरेशन सिंदूर'च्या निमित्ताने भारत तीन देशांशी लढला. पाकिस्तानचे सैन्य तसेच चीन आणि तुर्कीयेच्या

IPS सिद्धार्थ कौशल यांचा राजीनामा

नवी दिल्ली : भारतीय पोलीस सेवेत (IPS / Indian Police Services) १३ वर्ष सेवा केल्यानंतर आंध्र प्रदेशमधील आयपीएस अधिकारी सिद्धार्थ

२५ जुलैपासून रेल्वेची रामायण यात्रा पर्यटन ट्रेन सुरू

मुंबई: भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंसाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड

अ‍ॅपलच्या योजनेला ब्रेक; ३०० चिनी अभियंते भारतातून माघारी

मुंबई : भारताची जागतिक उत्पादन केंद्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या अ‍ॅपलच्या 'आयफोन १७' प्रकल्पाला

भारतीय सैन्याला मिळणार १.०३ लाख कोटी रुपयांची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि वाहने

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने १.०३ लाख कोटी रुपयांची शस्त्रे आणि लष्करी उपकरणे खरेदी