पाकिस्तानकडून सलग सातव्या रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताकडून चोख प्रत्युत्तर

श्रीनगर : पाकिस्तानने सलग सातव्या रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन गोळीबार केला. भारतीय चौकी - पहारे यांना लक्ष्य करुन पाकिस्तानने गोळीबार केला. भारताकडून सलग सातव्या रात्री पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २६ नागरिकांची हत्या केली. नाव आणि धर्म विचारुन गोळीबार करण्यात आला. या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. तणाव वाढू लागल्यापासून सातत्याने पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे आणि भारताकडून त्याला प्रत्युत्तर दिले जात आहे.



पाकिस्तानने सातव्या रात्री म्हणजेच बुधवार - गुरुवार दरम्यान रात्री कुपवाडा, उरी आणि अखनूरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आणि भारतीय चौकी - पहारे यांना लक्ष्य करुन गोळीबार केला. भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. हलक्या शस्त्रांद्वारे पाकिस्तानकडून गोळीबार सुरू होता. भारताने पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले.

भारत - पाकिस्तान सीमेवर गोळीबार सुरू असल्यामुळे दररोज कित्येक तास स्थानिकांना बंकरमध्येच वास्तव्य करावे लागत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकारी योजनेत सीमेजवळच्या शेकडो गावांमध्ये दर्जेदार बंकर बांधण्यात आले आहेत. या बंकरमध्ये नागरिक सुरक्षित आहेत.
Comments
Add Comment

भारतीय जॉब मार्केटची विक्रमी झेप; 'एआय'मुळे भरती प्रक्रियेला वेग

९ कोटींहून अधिक जॉब अॅप्लिकेशनची नोंद नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि रोजगार बाजारपेठेसाठी २०२५ हे

शाळांमध्ये सकाळचा नाश्ता देण्याची केंद्राची सूचना

शिक्षणासोबत पोषणावर भर नवी दिल्ली : शालेय विद्यार्थ्यांना संतुलित व पुरेसे पोषण मिळावे, या उद्देशाने केंद्र

‘जेन-झी’वर माझा विश्वास : पंतप्रधान मोदी

भारताचा ‘विकसित राष्ट्राचा’ निर्धार याच मुलांच्या हाती नवी दिल्ली : जेन-झी पिढीच्या मुलांवर माझा विश्वास असून,

चीनच्या उत्पादनांवर ‘अँटी-डंपिंग’ शुल्क

केंद्र सरकारचा धाडसी निर्णय नवी दिल्ली : देशातील स्थानिक उद्योगांना बळ देण्यासाठी आणि 'ईज ऑफ डूइंग बिझनेस'ला

केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर निवडला गेला आहे. तिरुवनंतपुरम कॉर्पोरेशनमध्ये शुक्रवारी

‘हा तर संविधानाच्या मूलभूत रचनेला धक्का’

एअर प्युरिफायरवरील जीएसटी कपातीच्या हायकोर्टाच्या सूचनेवर केंद्र सरकारचा आक्षेप नवी दिल्ली : जीएसटी कमी