महानगरपालिकेने डिजिटल आरोग्य सेवांकडे टाकले महत्त्वाचे पाऊल

मुंबईतील दवाखान्यांमध्ये एचएमआयएस प्रणाली २ कार्यान्वित होणार


मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका एचएमआयएस २ प्रणाली ही आयुष्मान भारत डिजीटल मिशन (एबीडीएम) ला अनुरूप आहे. यामध्ये रुग्णाला एक विशिष्ट ओळखपत्र क्रमांक (आयडी) दिला जाईल. या ओळखपत्राच्या आधारे रुग्णांना दवाखान्यातून रुग्णालयात तसेच रुग्णालयातून दवाखान्यात संदर्भित केले जाऊ शकते. त्यांच्या उपचार पद्धतीचा आढावा (ट्रॅक) घेतला जाऊ शकतो. यामुळे रुग्णांना त्यांच्या मोबाइलवर त्यांच्या उपचारांच्या सर्व नोंदी एकाच ठिकाणी मिळू शकतील.


महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुंबईकर नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने अभिनव कार्यप्रणाली सुरू केली आहे. त्याची सुरूवात २ मे २०२५ पासून केली जाणार आहे. महानगरपालिका अंतर्गत कार्यरत सर्व दवाखान्यांमध्ये आधुनिक पद्धतीने आरोग्य सेवा पुरविण्यासाठी हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम (एचएमआयएस - २) ही डिजिटल प्रणाली कायर्यान्वित करण्यात येणार आहे, सार्वजनिक आरोग्यसेर्वामध्ये आधुनिकता, कार्यक्षमतेची वृद्धी आणि सेवा वितरणामध्ये गती साधण्यासाठी ही कार्यप्रणाली उपयुक्त ठरणार आहे.


मुंबईकर नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली एचएमआयएस २ प्रणालीची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. वासाठी सर्व दवाखान्यांना आवश्यक संगणक, इंटरनेट सुविधा व संबंधित यंत्रासमुग्री देण्यात आली आहे तसेच सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारपांना सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले आहे. या अगोदर रुग्णांच्या नोंदी ह्या कागदावर (पेपर) केल्या जात होत्या, मागील सहा महीने एचएमआयएस २ प्रणाली प्रायोगिक स्वरूपात राबविण्यात आली आहे. २ मे २०२५ पासून ही प्रणाली १७७दवाखान्यात कार्यान्वित केली जात आहे. तसेब, २१७ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांमध्येदेखील ३० मे २०२५ पर्यंत ही प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. एचएमआयएस २ प्रणालीच्या माध्यमातून रुग्णांची नोंदणी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी आणि औषध वितरण इत्यादी नोंदी डिजीटल स्वरूपात उपलब्ध होणार आहेत. तसेच औषध साठा व्यवस्थापन, रुग्णसेवा अहवाल, सांख्यिकीय विश्लेषण आणि धोरणात्मक निर्णयप्रक्रियेसाठीही ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. पुढील टप्यात एचएमआयएस २ ही प्रणाली प्रसुतीगृहे, उपनगरीय रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये यांच्यात देखील राबविण्यात येणार आहे. या पर्यावरणपूरक प्रणाली तंत्रज्ञानाचा वापर करून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम व उत्तरदायित्वपूर्ण बनवण्यात येत आहे. रुग्णसेवांचे डिजीटल रूपांतर घडवून नागरिकांना दर्जेदार व सुलभ सेवा देण्याच्या दिशेने हे एक सकारात्मक पाऊल आहे. मुंबईकर नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane on Nashik Tree Cutting : 'वृक्षतोडीवर आक्षेप, मग बकरी कापताना गप्प का?' पर्यावरणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांना मंत्री नितेश राणेंचा तिखट सवाल!

मुंबई : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा २०२७ (Kumbh Mela 2027) च्या भव्य तयारीला सुरुवात झाली असताना, साधूग्राम उभारणीसाठी

हनुमान रोड मेट्रो स्टेशनला डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देणार

मुंबई : शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विलेपार्ल्याचे माजी आमदार व

गोरेगावमधील मलनिस्सारण वाहिनीच्या खोदकामामुळे नागरिक हैराण

भाजपच्या माजी नगरसेविकेने अधिकाऱ्यांना घेतले फैलावर मुंबई  : गोरेगाव पूर्व येथील आरे भास्कर मार्गावर मल जल

आज-उद्या-परवा समुद्रकिनाऱ्यावर काळजी घ्या!

४ ते ७ डिसेंबर दरम्यान सलग तीन दिवस मोठी भरती मुंबई : मुंबईमधील समुद्रकिनाऱ्यांवर फेरफटका कारण्यासाठी जाणारे

निकाल लागून ४५ दिवसांनंतरही भरती प्रक्रिया मंदावलेलीच!

वैद्यकीय आरोग्य अधिकारी भरती प्रक्रियेत गोंधळ निकालानंतर ‘अतिरिक्त गुण’ नियम बदलाचा निर्णय वैद्यकीय आरोग्य

‘राजगृह’सह चैत्यभूमीवर नागरी सेवा-सुविधा उपलब्ध

सुमारे ८ हजारांहून अधिक अधिकारी - कर्मचारी तैनात मुंबई  : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण