असा IAS अधिकारी ज्याची ३४ वर्षांत ५७ वेळा झाली बदली

नवी दिल्ली : भारतात जेव्हा आयएएस अधिकाऱ्याच्या बदलीची चर्चा होते तेव्हा हमखास आठवतात ते आयएएस अशोक खेमका. अशोक खेमका ३० एप्रिल २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले. तब्बल ३४ वर्षांच्या कार्यकाळात त्यांची ५७ वेळा बदली झाली. यात अशा आठ वेळा आल्या जेव्हा ते एका ठिकाणी एक महिन्यापेक्षाही कमी काळ होते.

अशोक खेमका हे मूळचे पश्चिम बंगालमधील कोलकात्याचे रहिवासी आहेत. ते हरियाणा कॅडरचे १९९१ च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांचा जन्म ३० एप्रिल १९६५ रोजी झाला. या नोंदीनुसार ३० एप्रिल २०२५ रोजी वयाची साठी पूर्ण झाल्यामुळे ते भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले. त्यांनी हरियाणा कॅडरमध्ये राहून ३४ वर्षे प्रशासकीय सेवा केली. या ३४ वर्षांच्या प्रवासात कळत नकळत कोणालाही दुखावले असेल तर त्यांची माफी मागतो, अशी एक्स पोस्ट अशोक खेमका यांनी केली आहे. निवृत्त झालेले अशोक खेमका वकिलीच्या व्यवसायात प्रवेश करण्याची तयारी करत आहेत.

मारवाडी कुटुंबात जन्मलेल्या अशोक खेमकांचे वडील शंकरलाल खेमका हे ज्युट मिलमध्ये कारकून होते. पण शंकरलाल यांचा मुलगा एकदम हुशार होता. अशोक खेमका यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर येथून संगणक विज्ञान अभियांत्रिकीमध्ये बी.टेक केले. त्यांनी पीएच.डी. देखील केली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई येथून संगणक विज्ञानात पदवी पण घेतली. खेमका यांनी एमबीए देखील केले. नंतर त्यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून अर्थशास्त्रात एमए केले.

काँग्रेसच्या प्रियांका गांधी वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा आणि रिअल इस्टेट कंपनी डीएलएफ यांच्यातील जमीन व्यवहाराचा करार रद्द केल्यामुळे २०१२ मध्ये अशोक खेमका एकदम चर्चेत आले. या निर्णयामुळे ते एकदम राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय झाले. एक प्रामाणिक आणि निर्भय अधिकारी म्हणून ओळखले जाऊ लागले. या प्रामाणिकपणाची किंमत अशोक खेमका यांना मोजावी लागली. त्यांची ३४ वर्षांत ५७ वेळा बदली झाली. अनेक वेळा त्यांना कमी महत्त्वाच्या विभागात पाठवण्यात आले.

अशोक खेमकांनी २०१९ मध्ये हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रात प्रशासन ही आता सेवा राहिलेली नाही व्यवसाय होत आहे असे नमूद करुन त्यांनी प्रशासकीय व्यवस्थेविषयी नाराजी व्यक्त केली होती. अखेर अशोक खेमका हरियाणाच्या वाहतूक विभागातील अतिरिक्त मुख्य सचिव पदावरून निवृत्त झाले आहेत.
Comments
Add Comment

महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीसह देशातील वीस मुलांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’

नवी दिल्ली : वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील वीस मुलांना

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील कारची डीएसपींना धडक

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे एक धक्कादायक घटना घडली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यातील एका

राष्ट्रपती मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार आहेत. नियोजीत कार्यक्रमानुसार राष्ट्रपती

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले