Eknath Shinde : काँग्रेसने दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवली नाही; यामुळेच लाखो सैनिक शहीद झाले!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात


मुंबई : पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामुळे (Pahalgam Terror Attack) संपूर्ण जग हादरुन गेलं आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला असून 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) दिला आहे. या हल्ल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून अनेक राजकीय नेत्यांसह अभिनेत्यांनी देखील प्रतिक्रीया मांडल्या आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांनीही पहलगाम हल्ल्याबाबत वक्तव्य करत असताना काँग्रेसवर घणाघात केला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून अ‍ॅक्शनवर रिअ‍ॅक्शन केली जात आहे. मात्र, काँग्रेसने पाकिस्तानला योग्य उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, अशी बोचरी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. (Eknath Shinde On Pahalgam Attack)



पहलगाम हल्ल्याबाबत एकनाथ शिंदे म्हणाले की, 'पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानविरुद्ध सर्वात कठोर कारवाई केली. अ‍ॅक्शनवर रिअ‍ॅक्शन दिली. उच्चायुक्तालयातून ५ जणांना काढून टाकले. सिंधू जल करार स्थगित केला. अटारी सीमा बंद केली. पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगितले. देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सशस्त्र दलांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले, असे कधी घडले आहे का? पुलवामा हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक कोणी केले? यावेळीही पाकिस्तानला योग्य उत्तर मिळेल.' सकाळी तिन्ही सैन्याच्या पथकांमध्ये बैठक झाली आणि त्यात कठोर निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान मोदी पाकिस्तानचा पूर्णपणे नायनाट करून हिशोब चुकता करतील.' असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.


त्याचबरोबर, काँग्रेसने पाकिस्तानला योग्य उत्तर देण्याची किंवा दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवली नाही. काँग्रेसने फक्त व्होट बँकचे राजकारण केले आहे. यामुळेच लाखो सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

Comments
Add Comment

Mumbai Goa Highway News : गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील कामांना वेग; ३१ ऑगस्टपर्यंत चार उड्डाणपुलांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि कोंडीमुक्त

Maharashtra Police : राज्यातील ५ पोलीस अधिकाऱ्यांची राष्ट्रपती पदकासाठी निवड

मुंबई : पोलीस, कारागृह आणि नागरी संरक्षण दलात उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल दिल्या जाणाऱ्या

Sunetra Pawar : चाकण एमआयडीसीतील समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

रस्ते, वाहतूक अन् पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत

प्रवासी वाहनचालकांना मराठी शिकण्यास आणखी एका महिन्याची मुदत

मुंबई : राज्यातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲपवर चालणाऱ्या कॅबच्या अमराठी चालकांना मराठी भाषेचे प्राथमिक व व्यावहारिक

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंग बादल यांच्यावरील हल्ला निंदनीय; हल्लेखोरांना सोडणार नाही – एकनाथ शिंदे

मुंबई : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये

Sangli ST Accident : महाराष्ट्रात पुन्हा एकदा भीषण अपघात, सांगलीत एसटीच्या दोन बसची समोरासमोर धडक; 2 ते 3 प्रवाशांचा मृत्यू

सांगली : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात रेणावी घाटात गुरुवारी एसटीच्या दोन बसची समोरासमोर भीषण धडक झाली.