'हाऊसफुल ५' चा धमाकेदार टीझर तुम्ही पाहिलात का?

मुंबई : बहुप्रतिक्षित चित्रपट 'हाऊसफुल ५'चा धमाकेदार टीझर अखेर रिलीज झाला आहे. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या टीझरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.


रितेश देशमुखने शेअर केलेल्या या टीझरला हटके कॅप्शन दिले आहे. त्याने लिहिले की, "आजपासून १५ वर्षांपूर्वी, वेडेपणाची सुरुवात झाली. भारताची सर्वात मोठी फ्रँचायझी ५व्या भागासोबत परत आली आहे आणि यावेळी ती केवळ गोंधळ आणि विनोदी नाही… तर एक किलर कॉमेडी!" टीझरमध्ये पुढे एक खून होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता कोणाचा खून होणार, त्यामुळे काय परिस्थिती निर्माण होणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. या चित्रपटातील टीझरमध्ये कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे. या टीझरच्या सुरुवातीला अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन यांचे वेगवेगळे हावभाव दिसत आहेत. तसेच, नाना पाटेकरांचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे.


 


हाऊसफुल ५'ची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे. 'हाऊसफुल ५' चित्रपट ६ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, जॅकलीन फर्नांडिस, संजय दत्त, नर्गिस फाखरी, फरदीन खान, नाना पाटेकर, श्रेयस तळपदे, जॅकी श्रॉफ असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहे.


'हाऊसफुल' पहिल्या चार भागांना देखील चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. आता पाचवा भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दरम्यान, अक्षय कुमार नुकताच 'केसरी २' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर, रितेश देशमुख लवकरच 'रेड २' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो अजय देवगणसह प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

Comments
Add Comment

दशावतारान गाजवल्यान थिएटर!

५ कोटी २२ लाख कमाई, सगळीकडे शोज हाऊसफुल्ल ! Dashavtar Box Office Collection:  मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं

‘तू माझा किनारा’ – क्रिस्टस स्टीफन यांची मराठी चित्रपटसृष्टीत भावनिक सुरुवात!

मुंबई : चित्रपट निर्माते क्रिस्टस स्टीफन हे आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, त्यांचा पहिला मराठी