'कार्यस्थळी लैंगिक छळ होऊ नये, यासाठी सदैव दक्ष रहा'

  60

चित्रपट अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचे आवाहन


मुंबई (खास प्रतिनिधी) :सध्याच्या काळात सर्वच क्षेत्रात महिला सक्षमपणे कार्य करत आहेत आणि नावलौकिक मिळवत आहेत, याचा सार्थ अभिमान वाटतो. कार्यस्थळी लैंगिक छळ होऊ नये, यासाठी सदैव दक्ष राहायला हवे. ऐकू येणाऱ्या, दिसलेल्या आणि कळलेल्या गुन्ह्यांविरोधात आवाज उठवणे ही आपली फक्त जबाबदारी नसून कर्तव्य आहे, हे कायम लक्षात ठेवायला हवे, असेही कुलकर्णी म्हणाल्या. दरम्यान, याप्रसंगी महापालिका आपत्कालिन व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख रश्मी लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला.


लैंगिक छळप्रकरणी समुपदेशन, विधी सेवा, सायबरविषयक मदत आदींच्या बाबतीत बालक आणि महिलांना मदत करण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्राच्या वतीने ‘वन स्टॉप क्रायसिस सेंटर’ची स्थापना करण्यात आली आहे. तसेच ‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’ उपक्रम अंतर्गत महिला व बालकांच्या सायबर सुरक्षेसाठी समर्पित ‘सायबर वेलनेस’ केंद्राचीही सुरुवात करण्यात आली आहे. या दोन्ही केंद्रांचा शुभारंभ तसेच महिला सशक्तीकरण, सामाजिक न्याय आदी क्षेत्रांमध्ये महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते मंगळवारी २९ एप्रिल २०२५ रोजी गौरव करण्यात आला. परळ येथील सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्र येथे हा कार्यक्रम पार पडला.


मुंबई महानगरपालिकेच्या उपआयुक्त (विशेष) तथा सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्र समिती अध्यक्षा चंदा जाधव, ज्येष्ठ पत्रकार अशोक पानवलकर यांच्यासह समितीचे सदस्य आदी उपस्थित होते. कार्यस्थळी महिलांचा लैंगिक छळ होऊ नये तसेच त्यांना योग्यवेळी न्याय मिळावा, या उद्देशाने मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात महानगरपालिकेत महिलांच्या लैंगिक छळविरोधी तक्रारींसाठी समिती कार्यरत आहे. सर्वोच्च न्यायालयाने महिला लैंगिक छळासंदर्भात तयार केलेली विशाखा मार्गदर्शक तत्वांचा स्वीकार करणारी महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका आहे.


मुंबई महानगरपालिकेत सन १९९७ पासून कार्यरत या समितीअंतर्गत महिला लैंगिक छळविरोधी विविध जनजागृतीपर उपक्रम आदींचे आयोजन केले जाते. आजमितीस मुंबई महानगरपालिकेत एकूण ९२ समित्या कार्यरत आहेत. तसेच, मुख्य समितीच्या वतीने दरवर्षी सर्व समिती सदस्यांचे प्रशिक्षण आयोजित केले जाते. याच धर्तीवर, महानगरपालिकेने २००३ मध्ये लैंगिक छळमुक्त कार्यसंस्कृतीसाठी धोरण तयार केले आहे. कार्यस्थळी महिलांचा लैंगिक छळ अधिनियम अंतर्गत महानगरपालिकेच्या वतीने विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून सर्व प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावर या समिती कार्यरत आहेत. तसेच, या समितींच्या वतीने दरवर्षी रितसर प्रशिक्षणाचेही आयोजन केले जाते.


याच पार्श्वभूमीवर, लैंगिक छळप्रकरणी समुपदेशन, विधी सेवा, सायबरविषयक मदत आदींच्या बाबतीत बालक आणि महिलांना मदत करण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्राच्या वतीने ‘वन स्टॉप क्रायसिस सेंटर’ची स्थापना करण्यात आली आहे. तसेच ‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’ उपक्रम अंतर्गत महिला व बालकांच्या सायबर सुरक्षेसाठी समर्पित ‘सायबर वेलनेस’ केंद्राचीही सुरुवात करण्यात आली आहे. या केंद्राच्या वतीने शैक्षणिक संस्था, तळागाळातील समुदाय तसेच मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये सायबरसंदर्भात घ्यावयाच्या काळजीबाबत जनजागृती केली जाईल. सायबर गुन्ह्याच्या अनुषंगाने गरजेनुरुप नि:शुल्क विधी सहाय्य, तांत्रिक मदत आणि समुपदेशनही केले जाईल, अशी माहिती समिती अध्यक्षा चंदा जाधव यांनी दिली.

Comments
Add Comment

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई

शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून पसायदानाचे पठण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) :

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ