Shatrughan Sinha: खामोश शब्द वापराल तर..., मुंबई उच्च न्यायालयाने घातली बंदी

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाकडून दिग्गज अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, त्यांचा गाजलेला 'खामोश' हा शब्द आणि त्यांची ओळख पूर्णपणे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. त्यामुळे त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या नावाचा फोटोचा किंवा संवादांचा व्यावसायिक वापर करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे.


शत्रुघ्न सिन्हा यांनी खामोश प्रकरणात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. १६ फेब्रुवारी रोजी शत्रुघ्न सिन्हा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी अंतरिम आदेश दिला. न्यायालयाने स्पष्ट केलं की, सिन्हा यांची संवाद फेकीची शैली आणि विशेषतः 'खामोश' हा शब्द त्यांच्या सिनेमॅटिक ओळखीशी जोडलेला आहे.


त्यामुळे उच्च न्यायालयाने विविध वेबसाईट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आदेश दिले आहेत की, सिन्हा यांच्या संमतीशिवाय त्यांचा वापर करून तयार करण्यात आलेला मजकूर त्वरित हटवण्यात यावा. तसेच भविष्यात असा कोणताही मजकूर अपलोड करण्यास बंदी घातली आहे. न्यायालयाने म्हटलं आहे की, सध्याच्या डिजिटल युगात सेलिब्रिटींच्या ओळखीचा चुकीचा वापर वाढला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे एखाद्याचे नाव, आवाज किंवा शैली वापरून बनावट गोष्टी तयार केल्या जात आहेत, ज्यामुळे त्या व्यक्तीच्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो.

Comments
Add Comment

Mumbai News : पिकअप चालकाने बड्या कंपनीच्या अधिकाऱ्याला केली मारहाण

मुंबई : सकाळी घाटकोपर पूर्व येथे ईस्टर्न एक्सप्रेस वे वर ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला. एका पिकअप वाहनाच्या

Mumbai News : धक्कादायक! वाढदिवसाच्या केकमध्ये आढळली पाल, 11 जणांना विषबाधा; 4 जण ICUमध्ये

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील लक्ष्मी नगर परिसरातील निळकंठ अपार्टमेंटमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान

Auto Rickshaw : ऑटो-टॅक्सी चालकांना मराठीचे ज्ञान अनिवार्य; नियम न पाळल्यास तीन टप्प्यांत कारवाई

मुंबई : राज्यातील ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 18 ऑगस्टपासून कामापुरते मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात

Sunday Mega Block : रविवारचा मेगाब्लॉक; मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वाहतुकीत बदल; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतर रविवारी, 16 ऑगस्ट रोजी मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर मेगाब्लॉकचा परिणाम

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Mumbai's Bandra Fire : वांद्रे पश्चिम येथील इमारतीला आग; ७ जण रुग्णालयात

मुंबई : स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा होत असताना मुंबईच्या पश्चिम उपनगरातून मोठी बातमी आली आहे. वांद्रे पश्चिम