नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचेंद्र कुमार निवृत्त होत आहेत. यामुळे भारताच्या नॉर्दन आर्मी कमांडची जबाबदारी लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा हाती घेणार आहेत. नॉर्दन आर्मी कमांड ही जम्मू काश्मीर आणि लडाख तसेच सियाचीन येथील सर्व लष्करी कारवायांवर नियंत्रण ठेवते. पाकिस्तान आणि चीनच्या कारवायांना उत्तर देण्यासाठी याच कमांडकडून निर्देश दिले जातात. या कमांडचे कमांडर इन चीफ म्हणून लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा सूत्र हाती घेणार आहेत.
शर्मा यांच्या नावाचा विचार नॉर्दन आर्मी कमांडचे प्रमुख म्हणून वरिष्ठ पातळीवर काही दिवसांपासून सुरू होता. अखेर जबाबदारी सोपवण्याचा औपचारिक निर्णय २८ एप्रिल रोजी घेण्यात आला. याआधी पहलगाम हल्ल्यानंतर लगेचच लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा हे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्यासोबत श्रीनगरला पोहोचले होते. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला होता.
कोण आहेत लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा ?
लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा हे भारतीय सैन्यातील एक अनुभवी अधिकारी आहेत. ते मागील तीन दशकांपेक्षा जास्त काळ लष्करात आहेत. श्रीलंकेतील भारताच्या शांतीसेनेचे ऑपरेशन पवन, सियाचीन ग्लेशियर येथील ऑपरेशन मेघदूत, काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या विरोधात राबवलेले ऑपरेशन रक्षक, संसदेवर २००१ मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर करण्यात आलेले सीमेवरील नियुक्तीबाबतचे ऑपरेशन पराक्रम अशा अनेक आव्हानात्मक ऑपरेशन्समध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता.
नॉर्दन आर्मी कमांडकडे असलेल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या
नॉर्दन आर्मी कमांड पाकिस्तानसोबतच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर तसेच नियंत्रण रेषेवर आणि चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर लक्ष ठेवते. पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यानंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नॉर्दन आर्मी कमांडच्या कामाचा ताण वाढला आहे.
प्रतीक शर्मा यांची कामगिरी
प्रतीक शर्मा यांनी यापूर्वी लष्करी मुख्यालय, नवी दिल्ली येथे नव्याने स्थापन झालेल्या माहिती संचालनालयात डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स (डीजीएमओ), मिलिटरी सेक्रेटरी ब्रँच आणि अलिकडेच डायरेक्टर जनरल इन्फॉर्मेशन वॉरफेअर म्हणून वरिष्ठ पदांवर काम केले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर लगेचच ते लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्यासोबत श्रीनगरला पोहोचले होते. यातूनच्या त्यांच्या धोरणात्मक विचारसरणीचा आणि तयारीचा अंदाज येतो.
आम्ही मुंबई स्वच्छ केली, काहींनी मुंबईची तिजोरी साफ केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उबाठावर कडाडून…
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देश पाकिस्तान विरोधात एकवटला आहे. जो - तो पाकिस्तानची…
मुंबई : मराठी सिनेसृष्टीतून (Marathi) दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते प्रकाश…
मुंबई : पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५० लाख…
मुंबई : प्रेक्षकांना नेहमीच मनोरंजनासाठी चटपटीत मसालेदार कंटेन्ट हवा असतो. या स्पर्धेत मराठी चित्रपटांनी सगळ्याच…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार हाय अलर्ट मोडवर आहे. सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये…