Maharashtra Weather : पुढील तीन दिवस महत्त्वाचे! राज्यभरात वादळी वाऱ्यासह कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी

पुणे : यंदा मार्चच्या सुरुवातीपासूनच उष्णतेची तीव्रता वाढली आहे. मागील आठवडाभर विदर्भात तापमानाने नवनवे उच्चांक गाठले. तापमानात (Maharashtra Weather) मोठी वाढ झाल्याने विदर्भासह संपूर्ण राज्यभर तीव्र उन्हाच्या झळा (Heat Wave) सोसाव्या लागल्या. परंतु आता उष्णतेच्या लाटेची डोकेदुखी सहन केल्यानंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या हजेरीला तोंड द्यावे लागणार (Unseasonal Rain) असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनेक भागांत उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसल्यानंतर राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department) दिला आहे.



गेल्या आठवडय़ात कित्येक ठिकाणी तापमानाचा पारा ४५-४६ अंशांवर गेला होता. त्यानंतर वातावरणात अचानक मोठा बदल झाला आहे. अवकाळीचे ढग दाटण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडू शकतो, असे भाकीत हवामान शास्त्रज्ञांनी केले आहे. यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी चिंतेत सापडले आहेत. पुढील दोन-तीन दिवसांत तापमानात घट होईल आणि राज्याच्या अनेक भागांत अवकाळी पाऊस पडेल, असे हवामान अभ्यासकांचे मत आहे.



कोणत्या जिल्ह्यांत पावसाची शक्यता?


सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, नाशिक, पुणे, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. (Maharshtra Unseasonal Rain)



तीन महिन्यांत जगभर तापमानवाढ तीव्र होणार


राज्यासह देशभरात उष्णता भयंकर वाढली आहे. याचदरम्यान जागतिक हवामानशास्त्र संघटनेने नव्या धोक्याची घंटा वाजवली आहे. पुढील तीन महिन्यांत जगभरात तापमानवाढ अधिक तीव्र होईल. उत्तर दक्षिण प्रशांत, पूर्व आशिया आणि अरब या भागात उष्णता उच्चांक गाठेल, असा अंदाज जागतिक हवामानशास्त्र संघटनेने वर्तवला आहे. मे ते जुलैदरम्यान जगातील बहुतांश भागात पारा वाढू शकतो, असे हवामानशास्त्र संघटनेने म्हटले आहे.

Comments
Add Comment

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक

Nashik: 'कुंभमेळा म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचा महोत्सव'

नाशिक: आगामी काळात होणाऱ्या कुंभमेळ्या संदर्भात नाशिकमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीला मंत्री छगन भुजबळ

‘समग्र शिक्षा’ अभियानाच्या भविष्यातील आराखड्याबाबत केंद्र शासनाकडून मार्गदर्शन मागविले; महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेची माहिती

मुंबई: ‘समग्र शिक्षा’ ही केंद्र शासनाची योजना देशात सर्वत्र राबवली जाते. समग्र शिक्षा योजना ३१ मार्च २०२६ पर्यंत

Akola Crime News : अकोला हादरलं! 'धुरंधर' सिनेमा पाहून आले अन् दिवसाढवळ्या तिघांवर सपासप वार

अकोला : नांदेडमधील तिहेरी हत्याकांड ताजे असतानाच आता अकोला शहरातही तशीच धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील कौलखेड

वर्तमान व भविष्यातील आव्हानांचा विचार करुन शैक्षणिक पद्धतीला नवी दिशा आवश्यक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘महाराष्ट्र ज्ञान सभा-2026’राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन नागपूर : वैश्विक ज्ञानाचे भारतीयीकरण व भारतीय ज्ञानाचे

Pune Railway Station : पुणे - रेल्वे स्थानकावर येणार 6 नवीन फलाट

पुणे : पुणे स्थानकाच्या मुंबईच्या दिशेने असलेल्या यार्डमध्ये सहा नवीन फलाट होणार आहेत. फलाट क्रमांक ७ ते १२ असे