पहलगाम अतिरेकी हल्ल्याचे दोन धक्कादायक व्हिडीओ

पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २५ हिंदू पर्यटक आणि एक स्थानिक अशा २६ जणांना ठार केले. ज्या पहलगामला अनेक पर्यटन कंपन्या मिनी स्विर्त्झलंड म्हणतात त्याच ठिकाणी अतिरेक्यांनी पर्यटकांची हत्या केली. नाव आणि धर्म विचारुन अनेकांना ठार करण्यात आले. ही धक्कादायक घटना मंगळवार २२ एप्रिल २०२५ रोजी घडली.





पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याचे व्हिडीओ हळू हळू येऊ लागले आहेत. आता पहलगाम अतिरेकी हल्ल्याचे दोन नवे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत. यातील एका व्हिडीओत अतिरेक्यांच्या गोळीबारामुळे पर्यटक जमिनीवर कोसळताना दिसत आहेत. दुसरा व्हिडीओ जेमतेम २९ सेकंदांचा आहे. या व्हिडीओत अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केल्याचे आवाज ऐकू येतात. अतिरेक्यांनी गोळीबार सुरू करताच घटनास्थळी असलेल्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या मार्गाने पळायला आणि सुरक्षित जागा गाठायला सुरुवात केली. या पळापळीवेळी एका व्यक्तीने मोबाईलमध्ये व्हिडीओ करण्याचा प्रयत्न केला. या व्हिडीओत नागरिकांची पळापळ सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे.



लष्कर - ए - तोयबा या पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटनेची शाखा असलेल्या द रेझिस्टन्स फोर्स या संघटनेने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचे आधी जाहीर केले. नंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पवित्रा घेतला. भारताने सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित केल्याचे जाहीर केले. ही घोषणा झाल्यानंतर द रेझिस्टन्स फोर्स या संघटनेने पहलगाम हल्ल्याशी संबंध नाही, असा नवा दावा करण्याचा प्रयत्न केला.
Comments
Add Comment

Sheikh Hasina : बांगलादेशमधील हालचालींना वेग? RAW प्रमुखांनी घेतली पंतप्रधान तारिक यांच्या संरक्षण सल्लागारांशी भेट; शेख हसीनांच्या परतीचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली : बांग्लादेशातील राजकीय घडामोडींना आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. भारताची गुप्तचर संस्था रिसर्च

YouTube च्या नियमात मोठे बदल! आता नवीन क्रिएटर्ससाठी कमाईचा मार्ग होणार आणखी कठीण

नवी दिल्ली : युट्यूब (YouTube) वरून कमाई करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नवीन क्रिएटर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे.

Weather Update : मंगळवारी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली : उद्या म्हणजेच मंगळवारी ११ ऑगस्ट २०२६ रोजी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज

Minister Rajnath Singh : ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ उत्साहात संपन्न; दिल्लीत ८०० शिवसैनिकांचे ‘महारक्तदान’; संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांकडून रक्तवीरांचा गौरव

- सैनिकांसाठी महाराष्ट्रातून १६ हजार जणांची नोंदणी नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम आणि

DRDO Kaveri 2.0 : अमेरिकेच्या इंजिन विलंबाला भारताचा ‘स्वदेशी’ मास्टरस्ट्रोक! तेजस Mk1A साठी DRDOचा कावेरी 2.0 तयार; IAFची मोठी चिंता दूर होणार

नवी दिल्ली : भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजस Mk1Aच्या उत्पादनाला अमेरिकन GE F404 इंजिनांच्या विलंबामुळे अडथळे

Rajnath Singh : ‘रक्तदान करणारे योद्धे’, राजनाथ सिंहांकडून महाराष्ट्रातील रक्तदात्यांचे कौतुक!

नवी दिल्ली : देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी रक्तदान करणाऱ्या महाराष्ट्रातील रक्तदाते योद्धे आहेत,